पान:ज्योतिर्विलास.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहणे. येथे जी ग्रहणे दिसली किंवा दिसतील त्यांवर फुली केली आहे. त्यांत जी सूर्यग्रहणे खग्रास किंवा कंकण आहेत ती मुंबई, पुणे येथे तशीच दिसली व दिसतील असा नियम नाही. कोष्टकांतले चांद्रमास ग्रहलाघवी पंचांगाप्रमाणे आहेत. एका चक्रांत बहुधा ७० ग्रहणे होतात. त्यांत ४२ सूर्याची आणि २८ चंद्राची होतात. म्हणजे चंद्राच्या दीडपट सूर्याची ग्रहणे होतात. कधी चक्रांत ७१ ग्रहणे होतात; तेव्हां चंद्राची २९ होतात. चक्रांत सूर्याची ग्रहणे होतात पुष्कळ, परंतु एकाच स्थळी त्यांतली थोडीच दिसतात. ती एकंदर जितकी होतात, त्यांचा सहावा हिस्सा म्हणजे सुमारे ७ ग्रहणे एका ठिकाणी दिसतात. तीही पृथ्वीवर अन्य स्थली खग्रास किंवा कंकणाकृति असली तरी विवक्षित ठिकाणी तशी दिसतात असे नाही. बहुतेक खंडित म्हणजे अपूर्ण दिसतात. खग्रास किंवा कंकणाकृति फार थोडी दिसतात. चक्रांतील २८ चंद्रग्रहणांपैकी सरासरीने १८ एका ठिकाणी दिसतात. म्हणजे १८ वर्षांत पृथ्वीवर होणाऱ्या एकंदर ७० ग्रहणांपैकी ७ सूर्यग्रहणे व १८ चंद्रग्रहणे एका ठिकाणी दिसतात. ४५ दिसत नाहीत. खाल्डियन लोकांनी पुष्कळ ग्रहणे लिहून ठेविली होती, यामुळे त्यांस हे चक्र माहीत झाले होते. "सांप्रत पृथ्वीवर पाप फार झालें, ग्रहणे फार होऊ लागली," अशा प्रकारचे उद्गार कधीकधी ऐकं येतात. परंत त्यांत कांही अर्थ नाही, हे वरील विपचनावरून दिसून येईल. "आमच्या लहानपणी पाऊस फार पडत असे, अलीकड कमा पडू लागला," ह्या समजतीत कदाचित् कांही अर्थ असला तर तितकाही ग्रहणांविषयींच्या समजुतीत नाही. दोन्ही समजुती एकाच वर्गातल्या म्हटल्या तरी चालल. पावसाच्या मानांत विलक्षण फेरफार एका मनुष्याच्या आयुष्यांत होणेचा तर सभव नाहीच. कालांतराने फेरफार होत असला तर नकळे. परंतु ग्रहणांची संख्या निदान मनुष्योत्पत्तीपासून तरी नियमित आहे. पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि चंद्राच्या पलीकडे फार लांब सूर्य आहे. एथ्वी आणि चंद्र हे दोन्ही गोल अपारदर्शक आहेत. यामुळे सूर्याचा प्रकाश यांवर पडतो, तेव्हां सूर्य जिकडे असतो, त्याच्या दुसऱ्या बाजूस ह्यांची छाया पडते. रात्रीस पृथ्वीच्या ज्या अंगी आपण असतो, त्याच्या दुसऱ्या अंगास खाली सूर्य असतो. म्हणून आपल्या वरच्या बाजूस आकाशांत पृथ्वीची छाया पसरलेली असते. चंद्र नसला तर ही छाया आपल्या अनुभवास येतेच. याप्रमाणेच चंद्राची छाया पडते. अमावास्येच्या दिवशी सूर्याच्या थेट खाली चंद्र असला म्हणजे चंद्राची छाया पृथ्वीवर पडली पाहिजे. ह्या छायांमुळे चंद्रसूर्यास ग्रहणे लागतात. सूर्य स्वयंप्रकाश आहे म्हणून वास्तविक म्हटले म्हणजे त्यास ग्रहण कधीच नाही. म्हणजे त्याजवर कोणाची छाया कधीच पडावयाची नाही. परंतु त्याच्या आड चंद्र येऊन चंद्राची छाया पृथ्वीवर पडली म्हणजे जेथें ती पडते, तेथील लोकांस सूर्य दिसत नाही. म्हणून ते म्हणतात की सूर्यास ग्रहण लागले. छाया नसते नावरून दिसून लो," ह्या समजतातोन्ही समजुती मनुष्याच्या अ