पान:ज्योतिर्विलास.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नक्षत्रे. नक्षत्रे. धन ९ ज्योतिर्विलास. राशि. राशि . १ अश्विनी चित्रा अर्ध २ भरणी मेष १ १५ स्वाती तुला ७ ३ कृत्तिकांचा पाद १६ विशाखा ३ पाद कृतिका तीन पाद विशाखा पाद रोहिणी वृषभ २ १७ अनुराधा वृश्चिक ८ ५ मृगशीर्ष अर्ध १८ ज्येष्ठा मृगशीर्ष अर्ध १९ मूळ ६ आद्रा मिथुन ३ २० पूर्वाषाढा ७ पुनर्वसु तीन पाद २१ उत्तराषाढा पाद. पुनर्वसु पाद उत्तराषाढा ३ पाद ८ पुष्य कर्क २२ श्रवण मकर १० ९ आश्रेषा २३ धनिष्ठा अध १० मघा धनिष्ठा अर्ध ११ पूर्वा सिंह ५ |२४ शततारकाकुं भ ११ १२ उत्तरा पाद २५ पूर्वाभाद्रपदा ३ पाद उत्तरा तीन पाद पूर्वाभाद्रपदा पाद १३ हस्त कन्या ६ २६ उत्तराभाद्रपदा मीन १२ १४ चित्रा अर्ध | २७ रेवती चैत्र इत्यादि नांवें प्रथम चित्रा इत्यादि नक्षत्रांवरून पडली आहेत हे मागें सांगितलेच आहे. परंतु त्या त्या नक्षत्रींच चंद्र नेहमी पूर्ण होतो असें नाहीं; मागे पुढेही एकाद्या नक्षत्री होतो. उदाहरणार्थ चैत्रांत पूर्णिमेच्या दिवशी हस्त, चित्रा, स्वाती यांतून कोणतेही नक्षत असते. सांप्रत असा नियम आहे की, ज्या चांद्रम-- हिन्यांत सूर्याचें मेषसंक्रमण होईल त्याचे नांव चैत्र. ज्यांत वृषभ होईल त्याचे नांव वैशाख. याप्रमाणेच पुढे समजावें. ज्या महिन्यांत संक्रमण होणार नाही त्यास अधिकमास म्हणतात. आणि त्यास हल्ली त्याच्या पुढील महिन्याचे नांव देतात. चांद्रमासाचें मान सुमारे २९॥ दिवस आहे. आणि सूर्यास एक राशि क्रमण्यास २९॥ हून जास्त दिवस लागतात. एकदां चैत्रशुक्लप्रतिपदेस मेषसंक्रांति झाली अशी कल्पना करा. तर पुढील संक्रांति क्रमाने एक दोन तिथि पुढे जातां जातां काही महिन्यांनी अमावास्येच्या सुमारास संक्रांति होईल. श्रावणात वद्य १४ च्या दिवशी सिंहसंक्रांति झाली अशी कल्पना करा; दुसरे दिवशी अमावास्या झाली; पुढे दुसरी अमावास्या होईपर्यंत संक्रांति मुळीच झाली नाही; त्याच्या पुढील महिन्यांत शक्ल प्रतिपदेस कन्या संक्रांति झाली; तर त्या महिन्याचे नांव भाद्रपद हाइल; मध्ये एका महिन्यांत संक्रांति मुळीच झाली नाही, म्हणून तो अधिक झाला; त्यास स्याच्या पुढील महिन्याचें नांव देतात, म्हणजे अधिकभाद्रपद म्हणतात.