पान:ज्योतिर्विलास.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंचांग बारा चांद्रमासांचे ३५४ दिवस होतात आणि सौरवर्षाचे दिवस सुमारे ३६५॥ आहेत. ऋतु सूर्यावर अवलंबून आहेत, म्हणून वर्ष सौरमानाचे पाहिजे. मुसलमान लोक हिजरी सनाचे वर्ष सौर धरीत नाहीत. म्हणून त्यांच्या मोहरम महिन्यांत एकदां हिवाळा असला तर काही दिवसांनी पावसाळा येतो. आपण महिने चांद्र घेतो. परंतु ऋतूंचा फरक पडूं नये, चैत्रांत नेहमी वसंत ऋतु यावा, म्हणून वर्षे सौर घेतों. दोन्ही मानांचा मेळ बसण्याकरितां मध्ये ज्या महिन्यांत संक्रांति येणार नाहीं तो अधिकमास धरतो. आपल्या देशांत चांद्रमान सर्वत्र चालते. परंतु मलबारांत व बंगाल्यांत व्यवहारास सौरमास घेतात. मलबारांत त्यांची नावे मेष, वृषभ अशी आहेत. बंगाल्यांत चैत्र, वैशाख अशी आहेत. तेथें मेष संक्रांति ज्या दिवशी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी सौर वैशाख सुरू होतो, अशी रोति आहे. (कृष्णपक्ष सांप्रत सर्याची गति कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या महिन्यांत जलद असते. त्यास वृश्चिक, धन, मकर ह्या राशि क्रमण्यास २९॥ दिवसांहून कमी दिवस लागतात. म्हणून तेव्हां एकाद्या चांद्र महिन्यांत दोन संक्रांति होण्याची संधि कधी. कधी येते. अशा वेळी क्षयमास होतो. हा एकदा आल्यापासून प्रायः १४१ किंवा १९ वर्षांनी पुन्हां येतो. जेव्हां येतो तेव्हां त्याच्याबद्दल अधिक महिना त्याच्या मागे किंवा पुढे ३१४ महिन्यात येतो. हल्ली चालू असलेल्या पंचांगांच्या मानाने हैं लिहिले आहे. त्या मानाने शके १७४४ मध्ये मार्गशीर्ष क्षय झाला होता. पुढे शके १८८५ मध्ये तोच क्षय होईल. नर्मदेच्या दक्षिण पूर्णिमान्त मास अमावास्येपासून अमावास्येपर्यंत अमान्त आक्रपक्ष । चैत्र मोजतात. तो अमावास्येस संपतो म्ह णून त्यास अमान्त म्हणतात. नर्म देच्या उत्तरभागी पूर्णिमान्त मास चावैशाख लतो. बाजूस दोहोंच्या पक्षांची व्यशुक्लपक्ष वस्था दाखविली आहे. नर्मदोत्तरभागी वैशाख पूर्णिमान्त मास चालतात, तरी अधिककृष्णपक्ष मास अमांतावरून म्हणजे आमच्या - प्रमाणे धरितात. आरंभ कोठून करितात, म्हणजे चंद्रादिक कोठे आले असतां ते पहिल्या नक्षत्रा आल अस मानतात हा विचार केला पाहिजे. . गितला तो स्थिर नाही. तो नक्षत्रांत उलटा जातो. यामळे अश्विन्यादि नक्षत्र संपातापासन थोडी थोडी पुढे जातात असे दिसते. सूर्याचे उदगयन किंवा दक्षिणायन संपातास अनुसरून आहे. म्हणजे संपातापासून ९० अंशांवर उत्तरेस किंवा दक्षिणेस सूर्य असतो तेव्हां अयने होतात. नक्षत्रांत संपात मागे येतो, त्याप्रमाणे अयनबिंदूही मागें चळतात. वेदांगज्योतिष म्हणून आपला प्राचीन ग्रंथ आहे, ज्यष्ठ