पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२५] तत्त्वज्ञान.. परि विनंती एकी देवो । चित्त देतु ॥ ... तरि देवेसि स्वयं एक होती । मग माघौति जे न येती। ते देवेसि भिन्न आथी। की अभिन्न जी ॥ जरि भिन्नचि अनादिसिद्ध । तरि न येती हैं असंबद्ध। जे फुलां गेले षट्पद । ते फुलचि होती कां॥ पैं लक्ष्याहूनि अनारिस । बाण लक्ष्यी शिवोनि जैसे। मागुते पडती तैसे । येतीच ते ॥ .. ना तरि तूंचि ते स्वभावें । तरी कोण कोणसी मिळावे । आपणयासी आपण रुपावें । शस्त्रे केवि ॥ म्हणोनि तुजसी अभिन्न जीवां । तुझा संयोग वियोग देवा। न ये बोलो अवयवां । शरीरेसीं ॥...॥ इये आक्षेपी अर्जुनाच्या। तो शिरोमणि सर्वशांचा। तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ॥ मग म्हणे गा महामति । मात पावोनि न येती पुढती। ते भिन्नाभिन्न रीती। आहाती दोनी॥ जे विवेक खोले पाहिजे । तरि मी तेचि ते सहजें। ना आहाचवाहोच तरि दुजे । ऐसेही गमती॥ जैसे पाणियावरी वेगळ । तळपतां दिसती कल्लोळ । येन्हवीं तरी निखिळं । पाणीचि ते॥ कां सुवर्णाहूनि आने । लेणी गमती भिन्ने । मग पाहिजे तंव सोने । आधवचि ते। तैसे ज्ञानाचिये दिठी । मजसी अभिन्नचि ते किरीटी। येर भिन्नपण ते उठी । अज्ञानास्तव ॥ ज्ञा. १५. ३१७-६३४. - १ भ्रमर. २ निशाण.. ३ वेगळे. ४ भोसकणे, ५ वरवर. ६ चमकत असतां. ७ केवळ,