पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१७१] . साक्षात्कार. . १९३ मैं पवन अंबरा । कां कल्लोळ सागरा। मिळतां आडवारा । कोणाचा गा॥ म्हणौनि तूं आणि आम्हीं। हे दिसताहे देहधर्मी। मग ययाच्या विरामी । मीचि होसी॥ ज्ञा. १८. १३५३-१३६७. १७१. ऐक्यभक्ति. तरि जयांचे चोखटे मानसीं । मी होऊनि असे क्षेत्रसंन्यासी। जयां निजेल्यांत उपासी । वैराग्य गा॥ जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले। जे शांतीसि झाले । पल्लव नवे॥ जे परिणामा निघाले कोभ। जे धैर्यमंडपाचे स्तंभ। जे आनंदसमुद्री कुंभ । चुबकळोनि भरले॥ जयां भक्तीची येतुली प्राप्ति । जे कैवल्यात परतें सर म्हणती। जयांचिये लीलेमाजि नीति । जियाली दिसे ॥ जे आघवांचि करणीं । लेइले शांतीची लेणीं। जयांचे चित्त गवसणी । व्यापका मज॥ ऐसे जे महानुभाव । दैविये प्रकृतीचे दैव। जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझे॥ मग वाढतेनि प्रेमे । माते भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधमै । शिवतले नाहीं॥ ऐसें मीचि होऊनि पांडवा। करिती माझी सेवा। परि नवलावो तो सांगावा । असे आइक॥ ज्ञा. ९. १८८-१९६. १ अडचण. २ पलीकडे. ३ इंद्रिय. ४ आच्छादन, पिशवी.