पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ - - . 4 । ज्ञानेश्वरवचनामृत. [६१६३ १६३. भक्तांच्या उद्धाराची काळजी ईश्वरास आहे. जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी । ते देखोनियां पोटीं । ऐसे जाहाले । भवसिंधूचेनि माजे । कवणासी धाक नुपजे । तेथ जरी की माझे । बिहिती हन ॥ म्हणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करूनि त्यांचिया गांवा । धांवत आलो॥ नामाचेया सहस्त्रवरी । नावा इया अवधारी। सजूनियां संसारीं । तारूं जाहलों ॥ सैडे जे देखिले । ते ध्यानकांसे लाविले । परिग्रही घातले। तरियावरी ॥ प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटी । मग आणले तटीं । सायुज्याचिया ॥ परि भक्ताचेनि नांवें। चतुष्पदादि आघवे। वैकुंठीचिये राणिवे । योग्य केले ॥ म्हणोनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता। तयांत समुद्धर्ता । आथि मी सदा ॥ आणि जेव्हांचि का भक्ती । दिधली आपुली चित्तवृत्ति। तेव्हांचि मज सूति। त्यांचिये नोटीं॥ याकारणे गा भक्तराया। हा मंत्र तुवां धनंजया । शिकिजे जे यया । मागों भजिजे ॥ ज्ञा. १२. ८७-९६. . १ लाटांनी. २ बुडतील, स्पर्श केले जातील. ३ भीति. ४ तयार करून. ५ एकटे. ६ नावेवर. ७ पश्वादिक. ८ राज्याला. ९ प्रवेश. १० ठिकाणी.