पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ ज्ञानेश्वरवचनामृत. [$ १५३ ते शांति मैं गा सुभगा। संपूर्ण ये तयाचिया आंगा। तें ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरुष ॥ पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुले उणेपण शशी। कां सोळेया ऊनी जैसी । पंधरावी वानी॥ सागरीही पाणी वेगें । संचरे ते रूप गंगे। येर निश्चळ जे उगे । ते समुद्र जैसा ॥ ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाड आहे । तेचि शांतीचेनि लाहे । हाते तो गा॥ ज्ञा. १८. १०७६-१०८९. १५४. भक्ताची ईश्वरस्वरूपांत निमग्नता. ऐसा शरीरसंयोगाचिये राती- माजि धांवतां सडिया आयिती। तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली । तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दृष्टी ॥ .. ते वेळी जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एक आहे । अथवा निवांत जरी राहे । तन्ही मीचि तया ॥ हे असो आणीक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाही। जैसे सबाह्यजळ डोहीं । बुडालिया घटा ॥ तैसा तो मजभीतरी । मी तया आंतबाहेरी। हैं सांगिजेल बोलवरी । तैसे नव्हे ॥ ज्ञा. ७. १३०-१३४. १ कस..२ मिळवितो. ३ एकटा, ४ तयारीनें, ५ उनाडती. ६ उषःकाल. ७ कोवळे ऊन. ८ वाट..