पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१५३] साक्षात्कार.. १७७ तो जेणे क्रमें ब्रह्म । होणे करी गा सुगम। तया क्रमाचे आतां वर्म । आईक सांगो ॥ ज्ञा. १८. ९९६-१० १०. - - १५३. " साधनहतियेर । हळूचि ठेवी." ऐसा जिंतलिया रिपुवर्ग । अपमानिलिया हे जग। अपैसा योगतुरंग । स्थिर जाला ॥ वैराग्याचे गाढले । अंगत्राण होते भले । तेही नावेक ढिले । तेव्हां करी ॥ आणि निवटी ध्यानाचे खोडे । ते दुजे नाहींचि पुढे । म्हणूनि हात आसुँडे । वृत्तीचाही ॥ जैसे रसौषध खरें । आपुले काज करूनि पुरें। आपणही नुरे । तैसे होतसे ॥ देखोनि ठाकिंजता ठावो । धांवता थिरावे पावो। तैसा ब्रह्मसामीप्ये थायो । अभ्यास सांडी ॥ घडता महोद्धीसी । गंगा वेग सांडी जैसी। कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय ।। ना ना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुंळे। कां गांवापुढे वळे । मार्ग जैसा ॥ तैसा आत्मसाक्षात्कार । होईल देखोनि गोचर। ऐसा साधनहतियेर । हळूचि ठेवी॥. . म्हणौनि ब्रह्मेसीं तया । ऐक्याचा समो धनंजया। होतसे ते उपाया । वोहट पडे ॥ मग वैराग्याची गोधळुक । जे शानाभ्यासाचे वार्धक्य । योगफळाचाही परिपाक । दशा जे कां ॥ १ सोपें. २ सहजच. ३ अंगावर बळकट घातलेलें. ४ कवच. ५ क्षणभर. ६. उगारणे. ७ तरवारः हिसका बसतो. ९ विश्रांतिस्थानः १० बळ. ११ मिळतां. १२ खुंटते. १३ शस्त्र. १४ समय, वेळ. १५. मावळती वेळ. १२ - . . .