पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ ज्ञानेश्वरवचनामृत. [६११५ ११५. ईश्वरभक्तीविषयी कुळजातिवाचे निष्कारणत्व. म्हणोनि कुळ उत्तम नोहावे । जाती अंत्यजही व्हावे । धरि देहाचेनि नांवें । पशूचे ही लाभो ॥ पाहे पां सावजे होतिरं धरिलें। तेणे तया काकुळती माते स्मरिले। की तयाचे पशुत्व वावो जाहाले । पावलिया माते॥ अगा नांवे घेतां वोखटीं। जे आघवेया अधमांचिये सेवटीं । तिये पापयोनी ही किरीटी । जन्मले जे ॥ ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे कां दगड। परि माझ्या ठायी दृढ । सर्वभावें॥ जयांचिये वाचे माझे आलोप । दृष्टि भोगी माझौचि रूप । जयांचे मन संकल्प | माझाचि वाहे ॥ माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण। जया सर्वांगी भूषण । माझी सेवा ॥ जयांचे ज्ञान विषो नेणे । जाणीव मज एकातेचि जाणे । जयां ऐसे लाभे तरी जिणे । येन्हवीं मरण ॥ ऐसा आघवांचिपरी पांडवा । जिहीं आपुल्या सर्वभावा । जियावयालागी वोलावा । मीचि केला ॥ ते पापयोनीही हेतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां। परि मजसी तुकितां तुका । तुटी नाहीं॥...॥ राजाची अक्षरे आहातीं । तिये चामी एका जया पडतीं। तया चामासाठी जोडती । सकळ वस्तु ॥ वांचूनि सोने रुपे प्रमाण नोहे । एथ राजाशाची समर्थ आहे । तोच चाम एक जै लाहे । तेणे विकती आघवीं ॥ तैसे उत्तमत्व तेंचि तरे। तेंचि सर्वज्ञता सरे । जै मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥ १ नक्रानं. २ हत्ती. ३ व्यर्थ. ४ वाईट. ५ गोष्टी. ६ रिकामे. ७ तोलले असतां. ८ वजनाला. ९ कमतरता. १० कातडे. ११ मिळतात.