पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६११६ ] साक्षात्कार. १४३ म्हणोनि कुळ जाति वर्ण । हे आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ तेचि भलतेणे भावें । मन मज आंतु येते होआवे । आले तरी आघवे । मागील वीवो ॥ .. जैसे तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ॥ मग होऊनी ठाकती केवळ । गंगारूप ॥ कां खैर चंदनकाष्ठे । हे विवंचना तंवचि घटे। जंव न घापती एकवटे । अग्निमाजी ॥ तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया। कां शूद्र अंत्यजादि इया। जाती तंवचि वेगळालिया। जंव न पवती मात ॥ ज्ञा. ९, ४४१-४६० बट । - 1 - ११६. "माझिये भक्तीविण । जळों तें जियालेपण." एथ पार्था पुढतपुढती । तेचि ते सांगो किती। जरी मियां चाड तरी भाक्ति । न विसंबिजे गा॥ अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । आभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोस का वाहावा ॥ का रूपे वयसा माजा । आथिलेपणे कां गाजा। एक भाव नाही माझा । तरी पाल्हाळ ते ॥...॥ तैसे माझिये भक्तीविण । जळो ते जियालेपण। अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई ॥...॥ निंब निंबोळियाँ मोडोनि आला । तरि तो काउळियांसींचि सुकाळ जाहला । तैसा भक्तिहीन वाढिन्नला। दोषांचिलागीं ॥ कां षड्रस खापरी वाढिले । वानि चोइटां ठेविले । ते सुणेयांचे उपेगा आले । जियापरी॥ १ व्यर्थ. २ नाले, व ओढे. ३ विचारणा. ४ होते, घडते. ५ जाऊ नका. ६ कुलीनपणांत. ७ आनंद मानूं नका. ८ हांव. ९ संपन्नत्वाने. १० पसारा, व्यर्थ. ११ जगणे. १२ फळांनी.१३ चवाठा. १४ कुत्र्यांच्या. :