पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ नीतिविचारः __९७. कर्मानें सत्त्वशुद्धि, व सत्त्वशुद्धीने मोक्ष.. जिये यज्ञादानतपादिके । इये कमैं आवश्यकें । तिये न सांडावीं पांथिके । पाउले जैसीं ॥ हारपले न देखिजे । तंव तयाचा मागु न सांडिजे । कां तृप्त न होतां न लोटिजे । भाणे जेवीं ॥ नाव थेडी न पवतां । न सांडिजे केळी न फळतां। कां ठेविले न दिसतां। दीप जैसा ॥ तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी । तंव नोहावे यागादिकीं । उदासीन ॥ तरि स्वाधिकारानुरूपे । तिये यज्ञदान तपे । अनुष्ठावींचि साक्षेपें । अधिवरी ॥ जे चालणे वेगावत जाये । तो वेग बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशय आहे । नैष्कालागीं॥ अधिक जंव जंव औषधी । सेवायाची मांडी बांधी। तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥ तैसी कर्मे हातोपाती । कीजती यथानिगुती। ते रजतमें झडती । झाडा देऊनि॥ का पाठोवाटी पुढे । भांगारा खार देणे घटे। तें कीर झडकरी तुटे । निर्व्याज होय ॥ .. : तैसे निष्ठा केले कर्म । झाडी करूनि रजतम। सत्वशुद्धीचे धाम । डोळां दावी ॥ . म्हणौनि धनंजया । सत्वशुद्धी गिवसी तया। . तीर्थाचिया सावाया । आली कमैं ॥ तीर्थं बाह्य मळ क्षाळे । कमै अभ्यंतर उजळे। एवं तीर्थे जाण निर्मळे । सत्कर्मे चि॥ - १ वाटसरूं. २ हरवलेलें. ३ दूर करणे. ४ ताट. ५ तीर. ६ विषयी. ७ यत्नाने.. ८.अधिकच. ९ बंधन, निश्चय. . १०.लवकर...११- एकामागून एक. १२ सोन्यास. १३ निर्दोष. १४ बरोबरीलाः १५ स्वच्छ होते. .