पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७९] नीतीविचार. कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी। आदिलाची पैरवडी । करी तया ॥ तया गुरुमा टेके । जयाचा सुगरवा देखे । तरि तयाचा मंत्र शिके । येर ने घे ॥...॥ माझी मूर्ति निफेजवी । ते घराचे कोनी बैसवी। आपण देवो देवी । यात्रे जाय ॥ नित्य आराधन माझे। काजी कुळदेवता भजे । पर्व विशेषे कीजे । पूजा आना ॥ माझे अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी। पितृकार्या अवसरी । पितरांचा होय ॥ एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाड आम्हांसी। तेतुलाच नागांसी। पंचमीच्या दिवशी ॥ चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चउदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे॥ नित्यनैमित्तिक कम सांडी। मग बैसे नवचंडी। आदित्यवारी वाढी । बहिरवां पातीं। पाठी सोमवार पावे । आणि बेलसि लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो॥ ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी। अवधेनि गांवद्वारी । अहेव जैसी॥ ऐसेन जो भक्त । देखसी सैरा धांवत । जाण अज्ञानाचा मूर्त । अंवतार तो ॥...॥ जया जनपदी सुख । गजबजेचे कवतिक। वायूँ आवडे लौकिक । तोही तोचि॥ आणि आत्मा गोचर होये। ऐसी जे विद्या आहे। ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसू जो॥ १ व्यवहार. २ पहिल्याचे. ३ प्रकार. ४ मोठेपणा. ५ उत्पन्न करतो, बनवतो. ६ कार्यासाठी. ७ नवस. ८ पोसतो, उपासना करितो.९ वेश्या. १. एक चर्यवाद्य, निंदा, उपहास.