पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७९] नीतिविचार. येहवीं बोधा आलेनि ज्ञाने । जरी ज्ञेय न दिसेंचि मने। तरि ज्ञानलाभही न मने । जाहला साता॥ आंधळेया हाती दिवा । देऊनि काय करावा। तैसा ज्ञाननिश्चय आघवां । वायांचि जाय ॥...॥ पैंज्ञानाचिये प्रभेसवे । जयाची मती यी पावे। तो हाधिरणिया शिवे । परतत्वाते ॥ तोचि ज्ञान हे बोलतां । विस्मयो कवण पांडुसुता। काय सवितयाते सविता । म्हणावे असे॥ ज्ञा. १३. ६१६-६३३. ७९. अज्ञानलक्षण. आतां धनंजया महामती । अज्ञान ऐसी बदती । तेही सांगो व्यक्ती । लक्षणेसी ॥...॥ पाहे पां दिवस आघवा सरे । मग रात्रीची वारी वावरे । वांचूनि कांहीं तिसरं । नाहीं जेवीं॥ तैसे ज्ञान जेथ नाहीं। ते अज्ञानचि पाहीं। तरि सांगो कांहीं कांहीं। चिन्हे तिये॥ तरि संभावने जिये । जो मानाची वाट पाहे। सत्कार होये । तोष जया ॥ गर्वं पर्वताची शिखरें। तैसा महत्वावरूनि नुतरे । तयाचिया ठायीं पुरे । अज्ञान आहे ॥ आणि स्वधर्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळीं । उमिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा॥ घाली विद्येचा पसारा । सुये सुकृताचा डांगोरी। करी तेतुले मोहरा । स्फीतीचिया ॥...॥ १ जाहाला असतां. २ हातोहात. ३ बोलणे. ४ पाळी. ५ मानाकरतां. ६ दिवाळीचे दिवशी हिराची केरसुणी मांगलोक चावडीवर ठेवतात ती. ७ उभा केला. ८ केरसुणी. ९ दवंडी, प्रसिद्धी. १० प्रतिष्ठेच्या.