पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४] नीतिविचार माजी अथाव म्हणतां । थडियेचि पांडुसुता। पोहणार आइता । कांसी जेवीं ॥...॥ पाहेचा पेणी वाटवधा । तंव आजीचि होईजे सावधा। जीव न वचतां औषधा। धांविजे जेवीं ॥ एरवीं ऐसे घडे । जो जळत घरी सांपडे । तो मग न पवाडे । कुहा खणों ॥...॥ . म्हणोनि समथैसी वैर । जया पडिले हाडखाई। तो जैसा आठही पाहर । परजूनि असे ॥ ना तरि केळवली नोवरी । कां संन्यासी जयापरी। तैसा न मरतां जो करी। मृत्यु सूचना॥ पैं गा जो ययापरी । जन्मेचि जन्म निवारी। मरणे मृत्यु मारी । आपण उरे ॥...॥ आणि तयाचि परी जरी । न टेकतां शरीरा। तारुण्याचिया भरा- माजि देखे ॥ म्हणे आजिच्या अवसरी । पुष्टि जे शरीरी। ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥...॥ पद्मदळेसीं इसोळे । भांडताती हे डोळे। ते होतीं पडवळे । पिकली जैसी ॥...॥ मळमूत्रद्वारे । होऊन ठाती खोकरें। नवसिये होती इतरें । माझिया निधनी॥ देखोनि थुकील जग । मृत्युचा पडेल पांग। सोइरियां उबंग । येईल माझा ॥...॥ उभळिचा उजगरा । सेजारियां सोइलियां घरा। शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांत हा ॥ १ अथाक, अथवा खोलपाणी. २ उद्याचा. ३ मुक्काम. ४ घातक. ५ हाडॉस भेदणारे. ६ शस्त्र धारण करून. उपवर झालेली. ८ मरणाचा विचार. ९ म्हातारंपण. १० येतां. ११ वाळलेली भाजी. १२ स्पर्धेने. १३ फुटकी. १४ नवस करणारी १५पराधीनपणा, ओशाळगन. १६ कंटाळा.१७ खोकल्याची उमळ. १८ जागरण. 4 -