पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६७३ की निरभिमान उदैजणें । सूर्याचे जैसे ॥. कां श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेविण चाले। - तैसे अवष्टंभहीन भलें । वर्तणे ज्याचें ॥ ऋतुकाळी तरी फळती । परि फळलो हे नेणती। तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ति । कर्मी सदा ॥ एवं मनीं कर्मी बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहाली। एकावळीची काढिली । दोरी जैसी॥ संबंधेवीण जैसीं । अर्को असती आकाशी। देही कम तैसीं । जयासी गा॥ मद्यपाआंगींचे वस्त्र । कां लेपाहातींचे शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधले आहे ॥ तया पाडे देहीं । जया मी आहे हे सेचि नाहीं। निरहंकारता पाहीं । तया नांव ॥ ज्ञा. १३.५२५-५३४. C - - - ७४. दोषदर्शन. जन्ममृत्युजरादुःखें । व्याधिवार्धक्यर्कलुषे । तिये आंगा न येतां देखें । दुरूनि जो ॥...॥ म्हणे पूर्यगते रिगाला । अहा मूत्ररंध्रे निघाला। ' कटारे मियां चाटिला । कुचस्वेद ॥ ऐसऐसियापरी । जन्माचा कंटाळा धरी। म्हणे आतां ते मी न करीं । जेणे ऐसे होय ॥...॥ आणि मृत्यु पुढां आहे । तोचि कल्पांती कां पाहे । परी आजीच होये । सावध जो॥ CM अहंकारावाचून. २ नाश. ३ एकेरी हाराची. ४ भिंतीवरील चित्राच्या हातचें. ५ आठवणच. ६ मल. ७ पुवाच्या खड्यांत, ८ अरेरे...