पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६६] नीतिविचार. याकारणे किरीटी। इंद्रियांचिया गोठी । मनाचियेचि रहाटी । रूप केले ॥ ऐसा मने देहे वाचा । सर्व संन्यास दंडाचा । जाहाला ठायीं जयाचा । देखशील ॥ तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचे वेळाउळ । हे असो निखिळ । ज्ञानचि तो॥ जे अहिंसा काने ऐकिजे । ग्रंथाधारे निरूपिजे। ते पाहावी ऐसे 5 उपजे । तें तोचि पाहावा ॥ ज्ञा. १३. २९३-३१२. LU ६६. शांति. त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे। वरि पडिलिया नव्हे । वांकडा जो ॥...॥ उन्हाळेनि जो न तापे । हिमवंती न कांपे । कायिसेनही न वोसिपे । पातलेया ॥...॥ ना ना चराचरी भूतीं । दाटणी नव्हे क्षितीं। तैसा नाना द्वंदप्राप्ती । घामेजेना ॥ घेऊनि जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट। करी वाड पोट । समुद्र जेवीं ॥ . तैसे जयाचिया ठायीं । न साहणे कांहींचि नाहीं। आणि साहतसे ऐसेही । स्मरण नुरे ॥ ज्ञा. १३.३४ ४-३५१. १ सुंदर, विस्तृत. २ घर. ३ आध्यात्मिक, आधिदैविक व आदिभौतिक. ४ समुदाय. ५ भीत नाहीं. ६ श्रम पावत नाहीं. ७ समुदाय,