पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६२] नीतिविचार. ते गजबजी लागे कैसा । व्याधे रुंधला मृग जैसा। कां बाही तरतां वळसां । दाटला जेवीं॥ पार्था तणे पाडे । सन्माने जो सांकडे। गरिमेते अंगाकडे । येवोचि नेदी ॥ पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी। हा अमुका ऐसी नोहावी। सेंचि लोकां ॥ तेथ सत्काराची के गोठी । के आदरा देईल भेटी।। मरणेसी साटी । नमस्कारितां ॥ वाचस्पतीचेनि पाडे । सर्वज्ञता तरी जोडे । परि वेडिवेमाजी दडे । महिमेभेणे ॥ चातुर्य लपवी । महत्व हारवी। पिसेपण मिरवी । आवडोनी ॥ लौकिकाचा उद्वेग । शास्त्रांवरी उबग । उगेपणी चांग । आथी भर ॥ जगे अवज्ञाचि करावी। संबंधीं" सोयचि न धरावी । ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु ॥ तळवटपण बाणे । आंगीं हिणावो खेवणे । ते तेंचि करणे । बहुत करूनी ॥ हा जीत ना नोहे । लोक कल्पी येणे भावें। तैसे जिणे होआवे। ऐसी आशा॥ पैल चालत की नोहे । की वारेनि जात आहे। जना ऐसा भ्रम जाये । तैसे होइजे ॥ माझे असतेपण लोपो । नामरूप हारपो। मज झणे वासियो। भूतजात ॥ ऐसी जयाची नवसिये। जो नित्य एकांता जात जाये । नामोच जो जिये। विजनाचेनि ॥ १ अडवलेला. २ हातांनी. ३ पोहत असतां. ४ भौवांत. ५ सांपडला. ६ संकोचतो. ७ मोठेपणा. ८ आठवण. ९ मोबदला. १० कंटाळा. ११ नातलग. १२ हीनपण. १३ लहानपण. १४ भूषण, अलंकार. १५ भिवो. १६ नवस.