पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६६२ वायु आणि तया पडे । गगनेंसी बोलो आवडे। जीवप्राणे झाडे । पढियंती जया ॥ किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी। जाण तया ज्ञानेसी । शेजे जाहाली ॥ पैं अमानित्व पुरुषीं । ते जाणावे इहीं मिषीं। आतां अदभत्वाचिया ओळखीसी । सौरस देवो ॥ ज्ञा. १३. १८५-२०२. - ६३. अखंड अगर्वता. आदि ब्रह्मा करूनि । शेवटी मशक धरूनि । माजि समस्त हे जाणोनि । स्वरूप माझे ॥ मग वाड धाकुट न म्हणती। सजीव निर्जीव नेणती। देखिलिये वस्तु उजू लुंठिती । माचि म्हणोनि ॥ आपले उत्तमत्त्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे। एकसरे व्यक्तिमात्राचेनि नार्वे । नमूंचि आवडे ॥ जैसे ऊंचीहनि उदक पडिले । ते तळवटवरी ये उगले । तैसें नमिजे भूतजात देखिले । ऐसा स्वभावोचि तयांचा॥ कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूभीसी उतरे देखा। तैसे जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती। जे जयजय मंत्र अर्पिती । माझ्या ठायीं ॥ नमितां मानापमान गळाले । म्हणोनि अवचितां माचि जाहाले। ऐसे निरंतर मिसळले । उपासिती॥ - ज्ञा. ९. २२१-२२७, - १ पटते. २ शय्या. ३ अभिप्राय. ४ चिलिट. ५ मोठे. ६ सरळ. ७ दंडवत घालतात. ८ एकसारखें. ९ निमुटपणाने. १० नम्र होतात. ११ एकाएकी, सहज,