पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंवर नाटक. , चे, भिगर्त, लोहिन, किरात, उपगिरि, कांबोजाधिप चीनदेश- पति ऋषक देशिचे, दशार्ण, अश्मक, किरान, उत्तर हूण हार आणि इंद्रउलूपति, कुलिंद अधिपति, यापरिचे नृप बहुदेशी चे रंगिपातले सन्मानुनित्यां सदनिं बसविलें बहुकौतुक झा लें ॥ चाल ॥ पातले नरपतिऐसे ॥ उहासि कुतुकें परिसे ॥१॥ याप्रमाणें सर्व देशोदेशींचे भूपाल येऊन बसले आहेत आणि जनकरा- जानें त्यांचें आदर आतिथ्य करून संतोषित केले आहे. आतां विश्वामित्रास- हित राम लक्ष्मणाचा प्रवेश समय आहे मीहि तिकडे समारंभ पाहण्याकरितां जाणार आहे तुझी इच्छा असेल तर माझ्या बरोबर चल, ह्मणजे सहज तो उन त्सव दृष्टीस पडेल. विदूषक०- अहो नाटकाचार्य आपण, छपन्न देशींचे राजे जनकपुरास आले आणि आतां जानकीच्या स्वयंवराचा उत्साह चालला आहे, ही एफ मोठ्या आ- नंदाची गोष्ट सांगितली, बरें तर तुमच्या ह्मणण्याप्रमाणें तो समारंभ पाह- ण्यास मीही येतो. सूत्रधार०- बहुत उत्तम आहे. चला तर. (असें ह्मणून दोघे निघून जातात. ९ जनकराजा, शतानंद आणि प्रधानमंडळीसह प्रवेश करितो.) जनक ॰ - गुरु महाराज, आजच स्वयंवराचा दिवस, तेव्हां पूर्वी आपल्याकडून देशोदेशीं राजास पत्रिका तर गेल्या आहेत. त्याप्रमाणें राजमंडळ अद्याप आले किंवा नाही. याचा शोध करून या. शतानंद - विदेहराज, राजमंडल तर काल असमानींच येऊन प्रविष्ट झालें आहे. त्याची व्यवस्था प्रधानजीनें यथासांग केली आणि ते सर्व राजे सभास्था- नीं प्राप्त झाले आहेत. अयोध्येचे अधिपति दशरथ महाराज मात्र अद्यापि याचयाचे आहेत दुसरें कोणी राहिले नाहीं. आणखी मी कर्णोपकर्णी अशी वार्ता श्रवण केली की, दशरथ राजाचे पुत्र विश्वामित्रानें यज्ञरक्षणार्थ आणि- ले होते, त्यास घेऊन ते स्वयंवरास येत आहेत.. जनक० - ( मनांत) सर्वव्यापक सञ्चिदानंद विग्रहाचे आगमन तरी कोठून हा वयाचें आहे आणि योगमायेचा लग्नाचा समारंभ त्याच्याशी आज नवीन का 8