Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जातील तिकडे ते परक्याप्रमाणे राहतात, व लोक त्यांच्या- शी परक्याप्रमाणे वागतात. परदेशांत जाण्याच्या प्रतिबंधामुळे हिंदु लोकांच्या म- नांत स्वतांविषयी खोटा अभिमान वागत आहे. ते परक्यांस म्लेंच्छ वगैरे अपमानाची व निंदेची नांवे देतात इतकेंच नाही, तर त्यांस असे वाटते की आमच्यासारिखे उंच लोक भूमंडळावर दुसरे नाहीत. आमचे ज्ञान, धर्म, आचार ही सर्व काही उत्तम; यवनादिकांचे ज्ञान, विद्या इत्यादि सर्व नीच. ज्यांच्या स्पर्शाने विटाळ होतो त्यांचे ज्ञान तें काय ऐकावें, व त्यांचा धर्म तो काय पाहावा ? अशा अभिमाना- खाली हिंदु लोक अज्ञान राहिले, व ह्या अज्ञानाने त्यांच्या अंगी अबलत्व आले, व इतर लोकांचे त्यांजवर वर्चस्व झाले. ३ जातिभेदामुळे देशांत लोकसुधारणा होत नाही. नीच मानिलेल्या जातींचा उंच मानिलेल्या जातींशी व्यव- हार नसल्यामुळे त्यांची चांगली रीतभात त्यांच्या पाह- ण्यांत येत नाही, इतकेच नाही; तर तिचे अनुकरण करण्याची यांस मोकळीकही नाही. अशा भेदामुळे लग्न- कायें, सण, सभा यासंबंधांनी निरनिराळ्या चाली पडल्या आहेत. भोजनाचे पदार्थदेखील जातिपरत्वें वेगळेवेगळे . .