Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे, परंतु जातीचे नियम व सोंवळे असें आहे की, तें चालवीत असतां परदेशांत राहणे अगदी अशक्य आहे. जर कोणी धैर्य धरून परदेशी जाऊन आला तर त्याच्या पा- ठीस जात लागते, त्याला हजारों रुपये खर्चुन हलकट प्रायश्चित ध्यावे लागते, तें असें कीं, मिशा बोडाव्या, शेण खावें, गोमूत्र प्यावें, इत्यादि. आणि एखाद्या मोठ्या महत् अप- राध्याप्रमाणे जातीला अति नम्रपणे शरण जावें. कधी कधी असें होतें कीं, इतकेंहि करून तो गृहस्थ जातिबाह्य राहतो, त्याच्या जातींत तट उत्पन्न होतात, एक तट त्याला कबूल करितो व दुसरा करीत नाही, असा घोंटाळा होतो. या भयामुळे कोणी हिंदुस्थानाच्या बाहेर प्रवासास जाण्यास धजत नाहींत. ज्यांस जातीची पर्वा नाही, अथवा ज्यांपाशी जातीस जेवणे देण्यापुरतें व ब्राह्मणांस संतुष्ट करण्यापुरतें द्रव्य (ह्मणजे हजारों रुपये ) आहे ते मात्र एखाद्या प्रसं- गी विलायतेस किंवा अमेरिकेस जातात. ही अडचण हिंदुस्थानाच्या बाहेर जाण्याविषयी आहे इतकेच नाही, तर स्वदेशांतदेखील हिंदु लोकांस सुख- सोयीने फिरतां येत नाही, तेणेकरून त्यांस आपल्या देशाची सुद्धां चांगली माहिती व लोकांशी स्नेह होत नाही. जिकडे ते 2