Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० २ परंतु ही अनीतीची वर्तणूक केवळ परदेशच्या लोकांशीच आहे असे नाही, तर हिंदूंमध्ये ज्या अनेक जाति आहेत त्यांच्यांतही परस्परांशी अशीच वागणूक आहे. ज्या जाति फारच खालच्या पायरीवर आहेत त्यांच्यांशी वरच्या पायरीचे लोक फारच निष्ठुरतेनें व अनीतीने वाग- तात. त्यांस ते आपल्या देवळांत येऊ देत नाहीत, त्यांस दुकानांत व बाजारांत मोकळ्या रीतीने वागू देत नाहीत, त्यांस ते आपल्या विहिरीवर पाणी भरूं देत नाहीत, ते प्रवास करीत असले तर त्यांस आपल्या ओटीवर किंवा आंगणांत देखील जागा देत नाहीत, त्यांस एकाच चा- वडीत किंवा धर्मशाळेंत उतरण्याचा हक्क नाही. एका गाडीत त्यांचे बसणे होत नाही. गांवांत सभा झाल्यास त्यांस वलावणें नाहीं, लग्नकार्यांत तर त्यांस जवळ उभे राहू देणार नाहीत. त्यांच्या घरांस आग लागली तर थोर जा- तीचे लोक ती विझविण्यास जाणार नाहीत. महापुराने त्यांची घरें वाहून गेली तरी त्यांस ते आपल्या घरांत घेणार नाहीत. ते आजारी पडले तर ब्राह्मण वैद्य त्यांची नाडी पाहणार नाही, आणि ते मेले तरी त्यांच्या प्रेताबरोबर कोणी जाणार नाही. ' महार मेला आणि विटाळ फिटला," " महाराची आई . "