Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ . अशुद्ध होते, व शेणाने ती शुद्ध होते ! मग तो कितीही थोर कुळांतला असो, राजा असो, राजपुत्र असो, विद्वान असो, गुणी असो, सदाचारी असो, परंतु तो अनार्य, अ- विंध, कर्महीन, कच्छहीन; त्याशी अन्नव्यवहारादि करणे अथवा त्याला आपल्या घरांत जागा देणे हे मोठे पाप आहे. जर तो किंवा त्याचे कुटुंब आजारी पडले, आणि त्याला निवाऱ्याच्या जाग्याची व पथ्यापाण्याची व मनुष्याच्या खट- पटीची गरज लागली तर कोणी हिंदु त्याजवळ उभा रहायाचा नाही. हिंदूंच्या सोंवळ्या बायका त्याच्या आजारी बायकोच्या अंथरुणापाशी जाऊन तिला पेजपाणी देणार नाहीत. कोण्या मावलीस दया आलीच व ती तिला शिवली तर तिने घरी येऊन सचैल स्नान केले पाहिजे. जर अशा मनु- ष्याला हिंदूंच्या जातीचे नियम ठाऊक नसले तर त्याला मोठे आश्चर्य वाटेल. तो ह्मणेल की, मी मनुष्यांमध्ये आहे किंवा जनावरांमध्ये आहे ? अथवा मी व माझें कुटुंब मनु- ष्यप्राणी आहों किंवा कोण आहों की, आमांशी हे लोक अशा निर्दयतेची व विलक्षण प्रकारची वर्तणूक करितात. त्याला ह्या गोष्टीचा उलगडा करितां येणार नाही, कारण त्याच्या देशांत व सर्व जगांत असा प्रकार मुळीच नाही. जर .