पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






विश्वबंधुत्व


      मध्यंतरी माझ्या मोबाइलवर कुणीतरी इंग्लंडमधील मँचेस्टर एरिनापुढे झालेल्या मानवी बाँबहल्ल्याची क्लिप पाठविली होती. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांसह २३ नागरिक मारले गेले. शंभर-सव्वाशे जखमी झाले. त्यानंतर काही दिवसांनी एका मुस्लिम युवकाने भर रस्त्यात उभे राहून । छापडीवर (कार्डबोर्ड) फलक लिहून आवाहन केले होते, 'मी मुस्लिम आहे, मला आलिंगन द्या.' इंग्लंडमध्ये आलिंगन हा सद्भावाचा शिष्टाचार समजण्यात येतो. झालं असं की लोकांनी रांगा लावून त्याला आलिंगन दिलं. त्यात आबाल, वृद्ध, दिव्यांग, स्त्री-पुरुष होते. त्यात एक असा सद्गृहस्थही होता की त्याचा भाऊ या बाँब हल्ल्यात मृत झाला होता.
     जर्मनची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथाचे एक चर्च होते. सेंट योहान्स चर्च त्याचे नाव. नुकतीच त्या चर्चमध्ये एक मशीद सुरू करण्यात आली आहे. खरं वाटत नाही ना? कधी कधी सत्य कल्पनेपेक्षा सुंदर असते नि शिवही! विशेष म्हणजे त्यांचे जे नव्याने नामकरण करण्यात आलेले आहे ना ते आहे ‘इब्न रश्द गोएथ' हे दोन विचारवंत, साहित्यिकांचं संयुक्त नाम होय. पैकी इब्न रश्द (१९२६-१९९८) हा स्पेनमध्ये जन्मलेला पाश्चात्य विचारवंत. धर्म व तत्त्वज्ञानाची सांगड त्यांनी घातली. दुहेरी सत्याचा सिद्धान्त मांडला. सत्य हे धार्मिक असते तसे तात्त्विकह. मुस्लिम असून त्यांनी कॅथलिक पंथीय धर्मविवेचन करून विश्वमान्यता मिळवली. योहान वॉल्फगाड् फॉन ग्यॉटड (१७५0-१८३२) त्याला आपण गटे म्हणून ओळखतो. हा जर्मन कवी, कादंबरीकार, संशोधक, प्रशासक, समीक्षक होता. ‘फाऊस्ट' हे त्यांचं जर्मन महाकाव्यात्मक नाटक वैश्विक साहित्यकृती म्हणून प्रसिद्ध आहे.
                          जाणिवांची आरास/१५९