पान:जपानचा इतिहास.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कडून ग्रंथाचें परीक्षण होण्यापूर्वीच चि० रा० श्रीधर अण्णा परलोकवासी झाले व त्यांचा ग्रंथप्रकाशनाचा बेत जागच्या- जागीं राहिला, पुढे एकसारखीं संकटे येत गेल्यामुळे प्रस्तुत पुस्तक लागलेंच प्रसिद्ध झालें नाहीं.

 सध्या, रुसो - जपानी महायुद्ध सुरू झाल्यापासून, जपाननें आपल्या अंगचें अप्रतिम शौर्य, लोकोत्तर मुत्सद्दीपणा व उत्कटदेशाभिमान दाखविल्यामुळे सर्व जग थक्क होऊन गेलें आहे; व जपानच्या इतिहासासंबंधीं लोकांची जिज्ञासा वाढत चालली आहे, आणि जपानसंबंधीं जितके ग्रंथ वाचावयास मिळतील तितके थोडेच असें घाटत आहे. अशावेळीं ग्रंथ प्रसिद्ध झाल्यास लेखकाचा हेतु सफल झा- ल्यासारिखा होईल असे जाणून सदर ग्रंथ रसिकवाचकांस अर्पण करीत आहे. लेखकाची ही सेवा वाचकवृंदास पसंत पडल्यास त्यांनीं लिहिलेले इतर ग्रंथही प्रसिद्ध करण्याचा "विचार आहे.

 हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचे काम आमचे विद्वान मित्र रा. रा. शेट दामोदर सांवळाराम यंदे यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. शेटजींच्या मदतीची जोड मिळाली नसती तर हे पुस्तक इतक्यांत प्रसिद्ध झालें नसतें. अशा मित्राचा लाभ होणें ही खरोखर ईश्वरी कृपा होय.

सांगली, जानेवारी
सन १९०५.

श्रीपाद दत्तात्रय देवधर-