पान:जपानचा इतिहास.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना
-०००००-

 दहावर्षापूर्वी चीन सारख्या अवाढव्य राष्ट्राशीं जो युद्ध- प्रसंग झाला त्यांत जपानसारख्या चिमुकल्या राष्ट्रास विजय- श्रीनें माळ घातली हें ऐकून जपानकडे सर्व लोकांचें लक्ष लागलें, व त्या देशाची विशेष माहिती मिळविण्याविषयीं लोकांची उत्सुकता वाढू लागली. इंग्रजीत जपानसंबंध बरींच पुस्तकें असली तरी केवळ मराठी जाणणारास बराचसा उपयोग होईल असें मराठींत पुस्तक नाहीं. ही उणीव दूर करण्याकरितां आपण एखादें पुस्तक लिहावें असें मनांत आणून माझे बंधु चि. रा. रा. श्रीधर दत्तात्रय देवधर यांनी माहिती मिळविण्यास सुरवात केली. ठिकठिकाणी मिळवि- लेली माहिती संकलित करून, तिच्या व विशेषतः 'मद्रास ख्रिश्चनलिटरेश्वर सोसायटीच्या' 'जपान' ह्या पुस्तकाचे आ. धारे ' जपानचा इतिहास' हैं पुस्तक लिहिलें, व आश्रय मिळण्याकरितां १८९६ सालीं तें डेक्कनव्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीकडे पाठविलें. पुढें १९०२ साली या पुस्तकास सोसायटीकडून चाळीस रुपयांचे बक्षीस देण्याचें ठरलें आहे. अर्से समजळें. कार्यबाहुल्यामुळें, सोसायटीस, पुस्तकपरीक्षण करण्यास इतका काळ लागला हें साहजिकच आहे.

 आपण लिहिलेल्या ग्रंथास पारितोषिक मिळालें हें ऐक- ण्यास, व पुस्तकास प्रस्तावनेदाखलं दोन शब्द लिहिण्यास, ग्रंथकार स्वतः असते तर, प्रस्तुत लेखकास फार आनंद झाला असता ! पण ईश्वरी इच्छा तशी नाहीं; सोसायटी