पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ । जगण्यात अर्थ आहे.. खरा आनंद 'सुर ख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' तुकाराम महाराजांचा हा अभंग सर्वांना सुपरिचित आहे. प्रत्येकाला वाटते की, माझ्या वाट्याला दु:ख पावलोपावली आहे. मी एका विवंचनेतून बाहेर पडतो न पडतो तोच दुसरी विवंचना माझ्यासमोर 'आ' वासून उभी असते; पण सुख मात्र क्वचितच मिळते. सुखाचा क्षण येतो अन् बघता बघता निघून जातो. हे असे का होते? -याचे कारण आहे माणसाचे मन. एखादी व्यक्ती, एखादे ठिकाण किंवा एखादी घटना यांमुळे आपल्याला आनंद मिळतो की 'दुःख' होते हे आपल्या मनावर अवलंबून असते. आजच्या संगणकाच्या युगात आपल्याकडे भौतिक साधनांची रेलचेल असणे म्हणजेच सुखी असणे असे जो तो मानू