पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निधन यांच्या स्मरण-यातनांनी दुःखी होतात. काहीजण भविष्यकाळच्या चिंतेपायी दुःखी असतात. भविष्याच्या पोटात काय दडले असेल... उद्या कसे होणार...? याचा विचार करत करत ते आजचा आनंद हरवून बसतात. भविष्याची चिंता करण्यापेक्षा आज प्रामाणिकपणे कष्ट करावेत. उद्याची चिंता करीत आजच्या सुखाला पारखे होण्यात मजा नाही. आज आपल्या भोवती ज्या चांगल्या गोष्टी आहेत, आपल्याजवळ जे चांगले गुण आहेत त्यांचा विचार करावा. Live the present हा मंत्र लक्षात ठेवावा. 'आनंद उपभोगण्यासाठी स्वैराचार करा' असा याचा अर्थ नव्हे. भूतकाळाची आठवण मनात ठेवून भविष्याला डोळ्यांसमोर ठेवून, नीतीमूल्ये जपत, इतरांना त्रास न होईल याची दक्षता घेत, इतरांना सुखावणारे वर्तन करावे; हा याचा अन्वयार्थ! जीवन जगताना आपल्याला नेमके काय करायचे आहे याचा तटस्थपणे, पूर्णांशाने विचार करावा आणि त्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक वाटचाल करावी. यात यशस्वी व्हायचे असेल तर 'मी आणि माझे' हे दोन शब्द आपल्या बोलण्यातून गाळावेत. स्वतःबद्दल कमीत कमी स्वार्थी राहावे. मनाला येईल तसे वागावे पण... इतरांच्या! अर्थात सुख मिळविण्यासाठी पैशाच्या मागे न धावता, चांगुलपणाच्या मागे धावावे. इतरांना सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी धावपळ करावी. एखाद्याला दहा रुपये द्यावेत असे जर आपल्या मनात असेल तर दहा रुपये आधी आपल्याजवळ असावे लागतात. त्याप्रमाणे जर आपण इतरांना सुख द्यायला निघालो तर आपणास त्या सुखाचा प्रत्यय येतो. तद्वतच, इतरांना दु:ख दिले तर ते दुःख आधी आपल्याकडे येईल. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला तर त्या सुखाचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल. आपण सर्वसाधारणपणे ब्याऐंशी वर्षे जगतो असे आधुनिक वैद्यकाची गतिमानता सांगत असली तरी, हा कालावधी दिवसांच्या हिशोबात केवळ तीस हजार इतका असतो. चाळिशी पार केलेल्या व्यक्तीच्या हातात जेमतेम 'पंधरा हजार दिवस' बाकी असतात याचा विचार 'सुखाचा सुख कशात ? । ५७