पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'आली जरी कष्टदशा अपार न टाकिती धैर्य तथापि थोर' संकटाच्या वेळी मन डगमगून चालत नाही. मन कमकुवत झाले तर पराभवाची शक्यता असते. जर हातात घेतलेले म्हणजेच संकटाशी मुकाबला करायचे काम कठीण असेल त आपली परीक्षा घेण्यासाठीच आले आहे असे मानावे व त्याच्याशी दोन हात करावेत. संकटाच्या प्रसंगी शक्यतो मुकाट्याने काम करीत राहावे. दुःख सर्वांनाच भोगावे लागते. दु:खांत कोणी वाटेकरी नसतो. म्हणून संकटाची, दु:खाची चर्चा करणे व्यर्थ आहे. आपले दुःख इतरांच्या चेष्टेचाही विषय होऊ शकते. म्हणून दुःख मुकाट्याने गिळावे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संकटे ही कायमची नसतात. कोणत्याही संकटाचे आयुष्य कमी असते. संकटे क्षणभंगूर असतात. म्हणून संकट दूर होईपर्यंत थोडा धीर धरावा आणि भरपूर परिश्रम करावेत. संकटे नेपोलियनला अतिशय आनंद होत असे. नेपोलियनचा उत्साह वाढत असे. नेपोलियनने म्हटले आहे की, 'मात करता येत नाही, असे कोणतेच संकट नसते.' अचानक आलेल्या संकटाला तोंड देण्याची हिंमत प्रत्येक माणसात असते, पण बऱ्याच जणांना याचा नेमका विसर पडतो आणि त्यामुळे संकटांतून येणाऱ्या अडचणींची काळजी करीत ते संकटापासून दूर पळतात. हे भ्याडपणाचे आणि त्याहूनही मूर्खपणाचे लक्षण म्हणावे लागेल. ‘संकटे मला सतत येऊ देत, त्यामुळेच मला तुझे स्मरण राहील' अशी प्रार्थना कुंतीने देवाजवळ केली होती. जगातील अनेक व्यक्तींनी संकटांशी मुकाबला केला. त्यांना धीराने तोंड दिले. म्हणूनच ते जगविख्यात झाले, अजरामर झाले. संकट हा सत्याकडे जाणारा मार्ग आहे. संकट आले तरच खऱ्या अर्थाने आपल्या मित्रांची, आपल्या नातेवाईकांची, सगे-सोयऱ्यांची पारख होते. नेहमी गोड बोलणारी माणसे संकटकाळात 'गोड वागणे' टाळून इतर सल्ले कसे देतात याची प्रचीती येते आणि माणसांची परीक्षा होते. १६ । जगण्यात अर्थ आहे..