पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छोटे संकटसुद्धा अक्राळ-विक्राळ वाटते, आपली झोप उडून जाते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या कामावर आणि आपल्या कुटुंबीयांच्या दैनंदिनीवर होतो. यासाठी संकट आले तर भिऊन जाऊ नये. त्याचे स्वागत करावे. कारण संकटे फक्त भित्र्या माणसांनाच घाबरवतात आणि संकटांना घाबरले की, संकटे मोठी वाटायला लागतात. आपल्याला जर उत्कर्ष साधायचा असेल तर संकटांना संधी मानावे. संकटांना जो संधी मानतो तो आशावादी असतो आणि तोच या जगात काही कार्य करून दाखवू शकतो. संधीलाही जो संकट मानतो तो निराशावादी असतो. त्याच्या हातून काही काम होत नाही. या लोकांना आयुष्य हेच एक संकट वाटत असते. हे लोक कधी हसताना दिसत नाहीत, यांच्या आयुष्यातील सुख- समाधान हे संकट, भीती आणि निराशा यांनी नाहीसे केलेले असते. संकटाला संधी मानल्यामुळे कार्यशक्ती जागी होते आणि संकटाची उंची कमी वाटायला लागते. त्यासाठी मन शांत ठेवून संकटांवर मात करायला हवी. आपल्याकडे कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणते चांगले गुण आहेत, आपण आयुष्यात काय काय चांगले करू शकतो याचा त्या क्षणी विचार करायला पाहिजे. पण हे होत नाही. याबाबतची एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा एका शिक्षकांनी वर्गात समोरच्या भिंतीवर एक भलामोठा पांढरा कागद चिकटविला. त्या कागदाच्या मध्यभागी एक छोटासा काळा ठिपका दिला. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या कागदाकडे पाहायला सांगितले आणि एक प्रश्न केला, “तिथे काय दिसते?” " प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तर दिले, “सर, मला एक काळा ठिपका दिसत आहे." 'काळ्या ठिपक्याशिवाय आणखी काय दिसते?” शिक्षकांनी पुढे विचारले. 66 सर्व विद्यार्थी एका सुरात उत्तरले, “आम्हाला काळ्या ठिपक्याशिवाय बाकी काहीच दिसत नाही.' >> शिक्षकांनी सांगितले, “मुलांनो, या भल्या मोठ्या कागदाचा भरपूर पांढरा भाग मला दिसत आहे आणि त्याच्या आकाराच्या मानाने काळा ठिपका खूपच लहान आहे.” १४ । जगण्यात अर्थ आहे..