पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ । जगण्यात अर्थ आहे.. वृद्धांसाठी सन्मानपूर्वक... मध्यंतरी वाचनात आलेल्या एका बातमीमुळे मन अस्वस्थ झाले. 'नवी दिल्ली येथील एका वृद्धाश्रमातील वृद्धांची संख्या अडीचशे झाली आहे आणि अजून अनेक वृद्धांना तेथे प्रवेश हवा आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांना त्यांचे आप्त घरी परत घेऊन जात नाहीत, त्यांचे तेथेच देहावसान होते त्यामुळे प्रतीक्षायादीतील वृद्धांना वृद्धाश्रमात प्रवेश मिळण्यासाठी कोणाच्या तरी मृत्यूची प्रतीक्षा करावी लागते.' हा या बातमीचा सारांश. वाढत्या लोकसंख्येबरोबर वयोवृद्धांचीही संख्या वाढत आहे. सुधारलेले राहणीमान, एकंदर मृत्युसंख्येतील घट, अनेक आजारांवर आधुनिक वैद्यकशास्त्रांनी केलेली मात, संसर्गजन्य रोगांवरील प्रभावी प्रतिजैविके... अशी अनेक कारणे आयुर्मर्यादा वाढण्यामागे