पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गरज आहे. स्वच्छतेच्या मूलभूत शिक्षणापासून ते दैनंदिन जीवनात काय खावे आणि काय खाऊ नये (आणि पिऊ नये) याबद्दल घसा फोडून आणि तेही वारंवार सांगावे लागते. अजूनही संसर्गजन्य रोगांचा आलेख चढत्या दिशेने धावत आहे आणि त्यावर औषधोपचारासाठी प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च होत आहे. 'आरोग्य' या संकल्पनेची प्रत्येक व्यक्तीने जाणीव करून घेऊन त्याप्रमाणे आचरण ठेवले तर, वैद्यकीय सेवेसाठी खर्च होणारा प्रचंड पैसा वाचून त्या पैशात अनेकांची पोटे भरू शकतील आणि इतर देशांच्या पोटात दुखावे इतकी प्रगती आपला देश करू शकेल. मग ‘कशासाठी?' '- पोटासाठी!' एवढाच विचार सर्वसामान्य माणसालासुद्धा न राहता 'कशासाठी?' '-सुखासाठी, समाधानासाठी, आरोग्यासाठी, - देशासाठी, - देशबांधवांसाठी.. असा 'सकस' विचार प्रत्येक व्यक्ती करू शकेल. - असा सुदिन येईल ? कशासाठी? पोटासाठी! । १४९