पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लवकर उठणे, निर्व्यसनी असणे, व्यायाम करणे... ) माणसाला आजारपण किंवा दुःख नको असते पण या दोन्ही गोष्टी देणारी व्यसनाधीनता मात्र त्याला दूर करता येत नाही; दूर ठेवता येत नाही. काही लोकांची व्यसन सोडण्याची इच्छा असते पण त्यासाठी आवश्यक असणारी मानसिक ताकद, दृढनिश्चय अंगी नसतो. त्यांना त्यासाठी कोणतेतरी रामबाण औषध हवे असते. एखादी गोळी किंवा इंजेक्शन घेतल्यावर व्यसन सुटावे अशी त्यांची इच्छा असते. पण औषधाबरोबरच नव्हे; औषधांहून महत्त्वाचा असतो तो व्यसन सोडण्याचा निर्धार. याबाबतीत एक गोष्ट आपणास बरेच काही सांगून जाईल. पिंटकराम नावाच्या दारुबाज माणसाला 'आपली दारू सुटावी' असे मनोमन वाटू लागले. त्यासाठी उपाय काय करावा म्हणून मित्रमंडळींकडे, ओळखीच्या व्यक्तींकडे त्याने चौकशी केली. आपल्या महान देशात आजही यासाठी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला न देता बुवा, मांत्रिक-तांत्रिक, महाराजांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. तसाच सल्ला त्याला मिळाला. सुदैवाने पिंटकरामला पांडुरंगशास्त्री नावाचे भले महाराज भेटले. पिंटकराम महाराजांना म्हणाला, “महाराज या दारूने माझे आयुष्य बरबाद झाले आहे. काही केल्या दारू सुटेना. आपण काही तरी जालीम उपाय सांगा. काही तरी मंत्र - तंत्र सांगा." महाराज म्हणाले, "हे बघ. जालीम उपाय सांगतो. मी सांगतो तो मंत्र आणि सांगीन ते तंत्र आत्मसात कर.' >> " पिंटकराम अधीर होऊन म्हणाला, “लौकर सांगा महाराज.' महाराज म्हणाले, "तू जरा इथे थांब. मी अशा बाबतीत समोरच्या झाडाचा सल्ला नेहमी घेत असतो. ते झाड मला सल्ला देते." पिंटकराम महाराजांकडे पाहत राहिला. महाराज त्या झाडाजवळ जाऊन झाडाला दोन्ही हातांनी मिठी घालून डोळे बंद करून थांबले. दहा मिनिटे गेली, वीस मिनिटे गेली, अर्धा तास गेला... महाराज झाडाची मिठी काही सोडत नव्हते. पिंटकराम कंटाळला. म्हणाला, “महाराज मला उपाय सांगता ना?” व्यसनाला वेसण । ११७