पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगम असलेल्या या संसाराबद्दल अनेक थोरामोठ्यांनी असे अनेक विचार व्यक्त केलेले आहेत. संत चोखामेळा यांनी म्हटले आहे- ऊस डोंगा परि रस नाही डोंगा काय भुललासि वरलीया रंगा। यासाठी विशेष करून युवावर्गाला सांगावेसे वाटते, संसाराची नौका नीट हाकायची असेल, ती यशस्वीपणे पैलतीरी न्यायची असेल तर एकमेकांचे प्रेम, विश्वास, श्रद्धा, समर्पण, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा अशा अनेक अंगभूत गुणांची गरज असते. आचार, विचार आणि उच्चार यांतील सौंदर्याची म्हणजे अंतरंगातील सौंदर्याची गरज असते. गोरेपणाची नव्हे. म्हणून मित्रहो, रंग नको, अंतरंग पहा. ११२ । जगण्यात अर्थ आहे..