पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने
ताता, पूर्णपरब्रह्म रामकृष्णादि अवतार पुढे जन्मतील त्यांची लीला निःशङ्क गात जावी । लज्जा त्यजावी । चरित्रे पाठ करावीं । नामें दीर्घस्वरें अुच्चारावीं' । हे आज्ञा स्मरोनी ध्रुव मधुवनचारी, अुत्तमाधिकारी, यमुनातीरविहारी, कृतशौच दन्तधावनोत्तर प्रातःस्मरणपूर्वक स्नानसन्ध्यादिक आवश्यक आचरौनि हरिकीर्तनीं रङ्गला । करतालिकायुक्त नर्तन, हावभावसहित नामावर्तन करूं लागला ।" (अकस ८)
यावरून मराठींत चूर्णिका म्हणजे थोडें गळ्यावर म्हणावयाच, सुसंस्कृत समस्तपदप्रचुर, नादगौरवयुक्त आणि सयमक असें गद्य होय हे विशद होअील.
निरञ्जनमाधवाने आपल्या 'सुभद्रास्वयंवरचम्पू' काव्यांत (निमाक ३।६६) चूर्णिकेचा अुपयोग ठिकठिकाणी केला आहे. चूर्णिकेत आवर्तनात्मक आन्दोलन नाही. तथापि पाण्डुरङ्गकविकृत स्थालीपाककथेंतील चूर्णिकेंत सप्तमात्रक आवर्तन असावेसे वाटतें. हें सप्तमात्रक आवर्तन नकळतहि आलेलें असेल.
"येरिकडे ऋषिभार देखति सारचोजगङ्गादिका । पञ्चपुरुषेसि पतिव्रता भलि निर्मि नूतन ते कनकाम्बरा । सुन्दरा अतिपामरा मज वर्णवेल किति सत्वरा ।" अित्यादि (अकलका २।१२९ ).
याला शिथिल पद्य म्हणतां येअील; कारण पद्य म्हणजे लयबद्ध अक्षरप्रबन्ध होय. तालाचें बन्धन सोडल्यावर होणारी स्वाभाविक रचना म्हणजे गद्यच होय.
"अेका मुलग्याने
पाहिली कळी
गुलाबाची कळी बहु गुलजार
तिला भुलुनिया तो जवळी
गेला, होअुनि लम्पट फार!
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !" (केक १८५)
Goethe च्या The Wild Rose च्या या केशवसुतकृत भाषान्तरांतील काही ओळी पद्मावर्तनी आहेत आणि काही नाहीत. ज्या नाहीत त्या बसवायच्या