Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/576

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५५३ छन्दःशाख्त्राचा अितिहास छन्दःसूत्रांच्या मागून काही शतकांनी हलायुधाने ही वृत्ति लिहिली, पण मध्यन्तरीं जीं नवीन वृतें निर्माण झालीं त्यांची पुरवणी त्याने पिङ्गलाच्या वृत्तसङ्ग्रहाला जोडली नाही. ज्या गाथाप्रकरणांत शिशुपालवधांतील श्लोकावरून सुचलेल्या अतिशायिनी नि विस्मिता या दोन वृत्तांचा समावेश आहे त्याच प्रकरणांत त्याच काव्यांतील 'कुटजानि वीक्ष्य शिखिभिः शिखरीन्द्र’ (शिशु ६l७३) या श्लोकावरून सुचणा-या * कुटजा ? वृत्ताचा समावेश कां नाही ही शङ्का हलायुधाला येथू नये याचें आश्चर्य वाटर्त. पिङ्गलाने जेथे यति साङ्गितला नाही अशा पुष्कळ वृत्तांत 'इत्याम्नायः' म्हणून हलायुध यति साड्गतो. कुमारललिता वृत्तांतच यतिभेदाचें म्हणून 'इदं वदनपद्म ? हें श्रुदाहरण देऊन ' द्वाभ्यां पञ्चभिश्व यतिमिच्छन्ति' असें तो म्हणतो. वस्तुतः पिङ्गल जसा यतिभेदाने मणिगुणनिष्कर, चन्द्रावर्ता, माला असे वृत्तभेद करतो तसा वृत्तभेद हलायुधाने मानून या वृत्ताला निराळे नांव देण्याची आवश्यकता त्याने कां प्रतिपादू नये? तसेंच श्रुतबोध त्याच्या परिचयाचा होता कारण इन्द्रवज्राचीं जीं तीन उदाहरणें हलायुध देती त्यांतील पहिलें श्रुतबोधांतीलच आहे. पण श्रुतबोधकार

    • इन्द्रियबाणैर्यत्र विरामा

सा कथनीया चम्पकमाला' (श्रुबो १५) म्हणून यात साङ्गत असतांना पिङ्गलाने यति कां साङ्गितला नाही याचा हलायुध विचारच करीत नाही. * पादतले पद्मोदरगौरे” म्हणून ज झुदाहरण हलायुध देतो त्यांत यति पाळलेला नाही हें एक कारण असू शकेल. १० झुत्पलाची विवृति भट्ट झुत्पल हा दहाव्या शतकांतच होऊन गेला. याने बृहत्संहितेवर जी विवृति लिहिली आहे तिच्यांत १०३ व्या अध्यायावरील टीकेंत पिङ्गलाच्या पद्धतीची सुधारणा आढळते. वृत्ताचें लक्षण पिङ्गलाच्याच परिभाषेने साङ्गितलेलें आहे परन्तु तें सूत्र त्या वृत्ताचा एक चरण होओील असें रचिलें आहे. जसे, ** लक्ष्मीरियं तभसजगैरुदाहृता ” वा ** द्रुतपदं नभञ्जयैः कथितं तत् ?”. या सुधारलेल्या पद्धतीचीं सूत्रे पुढे केदारभट्टादि छन्दःशास्त्रकार आणि मलिनाथादि टीकाकार देतात.