Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/573

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना &Ryo श्रुतबोधांत प्रमाणिका, रुक्मवती आणि लक्ष्मी या वृत्तांना अनुक्रमें नगस्वरूपिणी, चम्पकमाला आणि प्रभावती हीं नांवें दिलीं आहेत; आणि अक्षरपड्रित [।-७ ७ --]हें पश्चाक्षरी -हस्व वृत्तहि सङ्गितलें आहे. श्रुतबोधकाराने जातींचा विचार मुळीच केला नाही. ६ विरहाङ्काचा वृत्तजातिसमुचय विरहाङ्काचा वृत्तजातिसमुचय हा ग्रन्थ प्रो. हरि दामोदर वेलणकर यांनी सम्पादून प्रस्तावना आणि टीपा यांसह प्रकाशित केला आहे. विरहाङ्क हा नवव्या वा दहाव्या शतकांत, कदाचित्तू त्याच्या आधीच होऊन गेला असावा असें सम्पादकांचें मत आहे. याने मुख्यत्वें प्राकृतांतील जातींचें विवेचन प्राकृतांत* केलें आहे. परन्तु ५ व्या नियमांत याने संस्कृतांतील पन्नास वृत्तांचें विवेचन संस्कृतांत केलें आहे आणि ६ वा नियम प्रस्तारप्रकरणीं व्ययेित केला आहे. हा यति मानीत नाही; त्र्यक्षरी गणांचा उपयोग करीत नाही. हा एक विशिष्ट परिभाषा योजितो; वृत्ताचें लक्षण त्याच वृत्तांत साङ्गतो, जसें, सुरेन्द्रर्भ कर्ण चरणपटहं चन्द्रवदने प्प (?) यस्मिल्ललितगमने पश्यसि पुनः । नियुक्तं केयूरं मरकतयुतं भावसहितं ध्वजश्चान्ते यस्या सुतनु कथिता सा शिखरिणी । (विवृ५॥३५) सुरेन्द्रेभ (५ --), कर्ण (--), चरण (- ७ ~), पटह (~ ७ ~), केयूर (-), मरकत (-), भाव (~ ` ), ध्वज (७ -) या परिभाषेने हैं वृत्तलक्षण साड्गण्यांत आलें आहे. लघुतम वृत्तांत हा गौ (-) हें एकाक्षरी आणि नौ (--) हें द्वाक्षरी वृत्त देतो. दण्डक ती या संस्कृत वृत्तांत देत नाही; चौथ्या नियमांत देतो. त्याने दिलेला श्लोक (विवृ ४॥४६) हा व्यालदण्डकाचा आहे. उपजातीला विरहाडू मिश्र म्हणतो. वृत्तांना नवीन नवीन नांवें देऊन घोटाळा वाढविण्याचें स्वात

  • याव्यतिरिक्त प्राकृत पद्यप्रकारांचेंच विवेचन करणारे दोन ग्रन्थ प्रो. वेलणकर यांनी सम्पादून प्रकाशित केले आहेत; ते नन्दिताढ्यकृत गाथालक्षण आणि रत्नशेखरकृत छन्द:कोश हे होत.