पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने Կ8Կ छन्दःशाख्ाचा अितिहास विषयी प्रश्च उपस्थित होऊं नये. त्यामुठे * अत्र पादान्ते यतिः? असें जेव्हा हलायुध भाष्य करितो तेव्हा हसू येतें. पादान्तर्गत यतीविषयी पिङ्गलाचें म्हणणें अनेकदा सूचक असलें तरी त्याच्या विवेचनांत धरसोड आढळते; आणि गाजविलसित, वरतनु, शैलशिखा, कोकिलक, इत्यादि कित्येक वृत्तांत त्याने साङ्गितलेले यती अस्वाभाविक वाटतात. यतिप्रकरणीं पिङ्गलाचें मत प्रमाण मानिलें पाहिजे असें नाही. पिङ्गलाने वृत्तांचा क्रम चरणांच्या दीर्घतेप्रमाणे लाविलेला दिसतो आणि हीच पद्धत पुढे सर्वत्र आढळते. त्याने केवळ प्रसिद्ध वृत्तांचाच सङ्ग्रह केला आहे असें म्हणावें तर तत (पि ६/३४), वाहिनी (पि ६/४२) इत्यादि वृत्तांचा तो समावेश करतो. वाहिनीवृत्ताला तर चालच लागत नाही. उलटपक्षीं ज्या वियोगिनीवृत्तांत अश्वघोषाने सौन्दरनन्द काव्यांत एक सर्ग लिहिला आणि कालिदासाने 'रतिविलाप’ आणि 'अजविलाप’ लिहिले त्या वृत्ताचा पिङ्गलाला विसर पडलेला पाहून आश्चर्य वाटतें. मालभारिणीचाहि त्याला असाच विसर पडला आहे. नाराचक आणि विस्मिता या वृत्तांचीं उदाहरणें अनुक्रमें रघुवंश आणि शिशुपालवध या सुप्रसिद्ध काव्यांत असतांना त्यांचा समावेश तो गाथाप्रकरणों करती ! शास्त्रांत एका पारिभाषिक संज्ञेवरून एकाच गोष्टीचा बोध व्हावा; आणि ओका गोष्टीला अनेक पारिभाषिक संज्ञा असुं नयेत हा मूलभूत नियम त्याने पाळिला नाहीं. वृत्त हेंच नांव तो एका वृत्ताला देतो. ज्या वृत्तास तो सहाव्या अध्यायांत चत्र्चलाक्षिका (पि ६/३६) म्हणतो त्याच वृत्तास तो गाथाप्रकरणीं गौरी (पि८/५) म्हणतो, आणि पुन्हा गौरी (पि७/४) या नांवाचें निराळेच वृत्त तो सातव्या अध्यायांत साड्गतो ! एखादी पारिभाषिक संज्ञा सबळ कारणावांचून पालटू नये, पण ज्या वृत्ताला काश्यप सिंहोन्नता म्हणे, नि सैतव उद्धर्षिणी म्हणे त्या वृत्ताला पिङ्गलाने वसन्ततिलका कां म्हणावें याला त्याच्याजवळ काही कारण नाही. मूळ वृतें निर्माण कशीं झालीं आणि त्यांना नांवें कशीं पडलीं हें पिङ्गलाने साड्रिगतलें असतें, आणि प्राचीनतम वा सुप्रसिद्धतम झुदाहरणें लेखकांच्या नांवांसह दिलीं असतीं तर तो वृत्तान्त अत्यन्त महत्त्वाचा झाला असता. पण त्याने सूत्रे रचण्यापलीकडे काही केलें नाही. छन्दोरचना म्हणजे सामान्यतः ዩö, 8Vኳ
पान:छन्दोरचना.djvu/568
Appearance