Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/566

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ზგზe:3 छन्दइछाया जिथे जिथे नावा तिथे तोण्डाने पकवा चालूच हा ! वायूच्या बाळांस घेऊंधून पाठीस गातात तयांस गाणीं अहा!” २ (अशोक-बाबोमे ५१/६) स्वैरपद्य छन्द रा. वामन नारायण देशपाण्डे यांनी स्वैरपद्यासाठी समावर्तनी पण विषमचरणी छन्दाचा प्रयोग केल्याचें पुढील भुदाहरण त्यांच्या अप्रकाशित * रूपमती?

  • प्रणय सङ्गीत पहा रोमरोमीं भरून माझिया राहे;

वीणाच देहाची बने विचित्र ऽऽ तारा कचरूप तीज ! प्रणयाचे बोल त्या तारांमधून सदा झङ्कारती सदा हुङ्कारती परिसाया येती जरी परिसिले प्रीतीच्या कानांनी तेऽऽ दुज्यालागी परी ते दिव्य निस्वन कोठून औकणें?-औकून डोलणें! वाटेल त्या प्रती झुरेल सम्प्रती ऽऽ सारी नीरवता-सारी मौनता”ऽऽ (सपा-दसरा अड्क १९३६) या पद्यांत प्रत्येक चरणांत षण्मात्रक ७ आवर्तनें आहेत. अन्त्य आवर्तनांत निरनिराळ्या चरणांत निरनिराळ्या सशब्द मात्रा आहेत. त्यामुळे विरामाचा काल न्यूनाधिक झाला तरी वाचकाचा घोटाळा होत नाही. तथापि २ -या आणि ६ व्या चरणांत चौथ्या आवर्तनांत मध्येच ओक अक्षर झुणें करून द्विमात्रक विराम घेतलेला आहे. हा विराम जर अवग्रहचिन्हांनी लिहून दाखविलेला नसला तर मात्र वाचक अडखळण्याचा बराच सम्भव आहे.