Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/539

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 489 पद्माचें विषमाक्षर आणि समाक्षर मिळून ओखादा ह्यक्षरी शब्द नसावा. *। कां लोक धा - । वती असे ? यापेक्षा *। लोक कां धा - । वती असे ? महणणें कानाला आधक चाङ्गलें लागतें. मराठीतील अभड्ग, ओवी, घनाक्षरी अित्यादिकांची रचना छान्दस आहे. ख्रिस्ती झुपासनासड्गीतांत 'अिङ्ग्रजी चालीवर? म्हणून जीं पद्ये दिलीं आहेत तीं वस्तुतः छन्दीरूप आहेत. संस्कृतांत आणि प्राकृतांत न आढळणारी ही लगत्वभेदातीत छन्दोरचना मराठींत आढळते. अगदी आरम्भापासून आढळते ही गोष्ट चिन्तनीय आहे. ठोकळ मानाने लयाला अनुसरणा-या लोकगीतांपासून छन्दाचा झुगम झाला असावा. शिशुगीतांना म्हणूनच छन्द योग्य वाटतो. ओवीची रचना अनियमित वाटते. महानुभाव लोकांत शके १५०० च्या मागेपुढें भीष्माचार्य नामक ग्रन्थकाराने आपल्या मार्गप्रभाकर नामक ग्रन्थाच्या ज्ञानखण्डांत ओवीचें पुढील प्रमाणे बान्धलेलें लक्षण विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी आपल्या मराठी छन्द या पुस्तिकेंत श्रुध्दृत केलें आहे:-*गायत्री छन्दापासौनि धृतिपर्यन्त । ग्रन्थ वोवियाचे तीन चरण जाणावे निश्चित। प्रतिष्ठेपासौनि जगतीपर्यन्त। चौथा चरण. ” या लक्षणांत गायत्रीच्या ठिकाणीं सुप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेच्या ठिकाणीं मध्यमा अशी सुधारणा राजवाडे यांनी सुचविली आहे. ओकूण काय लेखी ओवीचें स्वरूप फारच अनियमित आहे. परन्तु ओवी हा गेय पद्यप्रकार होता असें दिसते. सङ्गीतरत्नाकराच्या प्रबन्धाध्यायांतील पुढील अवतरण प्रो. ग. ह. रानडे यांनी माझ्या दृष्टीस आणिलें आहे:- ‘ खण्डत्रयं प्रासयुत गीयते देशभाषया ओवीपदं तदन्तेचेदोवी तज्जैस्तदोदिता त्रयाणां चरणानां स्युरेकाद्यावृतितो भिदाः आदिमध्यान्तगैः प्रासैरेंकाद्येश्ध पदे पदे छन्दोभिर्बहुभिगैंया ओव्या जनमनोहराः सानुप्रासैस्त्रिाभिः खण्डैर्मण्डिता प्राकृतैः पदैः ? ज्या गेय ओव्या आजीबाअींच्या आणि मुलीबाळाच्या तोण्डून अद्यापि औकायला मिळतात त्यांतील शैथिल्य मर्यादित दिसतें. आणि त्या ऐकून ज्या