Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/387

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना o

  • हर्षखेद ते मावळले,

हास्य निवालें, काय म्हणावें या स्थितिला ? झपूऽझ गडे झपूऽझ!” (केक १०७) १८ जातीचें नामकरण जातिरचना वृत्तरचनेहून सुकर आहे तशीच ती अधिक विविध आहे. या विस्तीर्ण जातिजालांत जे निश्धित जातिप्रकार आढळतात त्यांना आणि ते ज्य मात्रावलींनी सिद्ध होतात त्यांना नांवें द्यायलाच हवींत. पद्याच्या शिरोभागीं “चाल वा धाटी अमुक पदाची ? अशी सूचना देण्याची जुनी पद्धत आहे. पण सारे कवि सर्वपरिचित नि सर्वसम्मत अशा ओकाच पदाची चाल देतात असें नाही. कित्येक कवी तर आपल्या स्वतःच्याच पण लोकांस अपरिचित अशा पद्याची चाल कवितेच्या शिरोभागीं देतात! पुन्हा, चालीवरून विशिष्ट स्वरावलीचा बोध होऔील, पद्याच्या घटनेचा बोध होणार नाही. यशवन्तकृत 'कुणा तुझ्या वैभवाचा पडेल ना मोह?? (यग ६१) या कवितेच्या शिरोभागीं चाल 'प्रतिकूल होअिल कैसा० ” या पदाची दिलेली आहे. परन्तु हें पद जातिस्वरूप आहे तर यशवन्तांची कविता छन्दःस्वरूप आहे ! पूर्वी गाण्याच्या पदावर राग आणि ताल देण्याची पद्धत होती. खिस्तशके १९२० मध्ये ताम्बे यांच्या कवितेचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यापासून कवितेच्या शिरोभागीं रागाचें नांव देण्याची टूम निघाली आहे. बहुजनसमाजाला चाल कळायला या टुमीचा काही झुपयोग होत नाही; आणि रागाच्या नावावरून जातीची घटना कळण्याचा सम्भव तर सुतराम् नाही. अमुक ओका पद्याची जाति अमुक ओक म्हटल्याने वाचकास एका आदर्शभूत