पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Rue १६ काही विशेष गुन्तागुन्तीच्या मात्रावली १ली मात्रावली अष्टमात्रक आवर्तनाची आहे. [-॥-+ऽ-७ ॥+ऽऽ+] या मात्रावलींत अष्टमात्रकाची दोन आवर्तनें आहेत. पहिल्या दोन मात्रा होतांच आवर्तनारम्भ होतो. आवर्तनाची तिसरी आणि चौथी मात्रा मिळून गुरुच अक्षर लागत कारण प्रसंगविशेषीं तें प्लुतहि श्रुचारावें लागतें. पुढे (-७) हाच गण या आवर्तनांत येतो आणि ओक मात्रेची झुणीव झुपान्त्य वा त्यापूर्वील अक्षर प्लुत झुचारून भरून काढण्यांत येते. दुस-या आवर्तनांत आरम्भी शुद्ध गुरुच लागतो; कारण त्याच्यावर चार मात्रांचा काळ व्ययित करायचा असतो; आणि पुढील गुरूला जोडूनच आद्यतालकपूर्व गण घ्यायचा असतो. या मात्रावलीच्या द्विरावृत्तीने चरण साधितांना शेवटीं ओक अक्षर झुणें करून दोन मात्रांच्या विरामाची सोय करण्यांत येते; जसें [ーlー+Sー・1+ss+。ーlー+Sー・1+ss] * कधिं । करितीऽ लग्र । माऽऽझें, तुज । ठावेंऽ अीश्व-राऽऽ ” या मात्रावलीच्या आवृत्तीनें रेवतीजाति सिद्ध होते. २री मात्रावलीहि अष्टमात्रक आवर्तनाचीच आहे. ही मात्रावली म्हणजे * काय पुरुष । चळले बाओी । ऽऽ”ची होय. ही मात्रावली म्हणण्याचा विशेष असा आहे की ज्या आवर्तनांत सहा मात्रांच्या आद्यतालकपूर्व गणाचा समावेश होतो त्याचा आरम्भ सशब्द मात्रेवर नाही; तर मागील आवर्तनांतील अन्त्याक्षराच्या लाम्बवलेल्या स्वरावर आहे अस म्हणतात. पद्यरचनेत या म्हणण्याच्या वैशिष्ट्याला महत्व नसावें. सहा मात्रांच्या आद्यतालकपूर्व गणाची घडण ही म्हणण्याच्या विशिष्ट पद्धतीसाठी अशी लागते की त्याचे तीन तीन मात्रांचे दोन तुकडे पडावेत. म्हणून या ठिकाणीं (५ - ७ -), (७ -- ५), (- ७ ७ -), (- ० - ५) असे चार प्रकार चालतात पण (--:-) असा त्र्यक्षरी गण चालत नाही. पहिल्या आवर्तनाच्या अष्टमात्रक गणाच्या ठिकाणीं सुद्धा (---+) हा पद्याचा पहिलाच प्रकार चालतो; अितर अष्टमात्रक गण चालत नाहीत.
पान:छन्दोरचना.djvu/385
Appearance