Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՅՅԿ जाति-जीवन कुलक [। प। प] मात्रावलीच्या मालेंत चरणसमाप्तिच होणार नाही; कारण, पादाकुलकाच्या अन्तीं आवर्तन पूर्ण होत असल्यामुळे तेथे ओकाहि मात्रेचा विराम घ्यायला कूस नसते. झुलटपक्षीं विरामानुरोधानेच चरणनिर्णय केल्यास

  • निज नीज गडे नीज गडे लडिवाळा ” [- ।-- +ऽऽ।प । -+] या चरणांत दुस-या आवर्तनांत अन्तीं द्विमात्रक विराम असल्याने त्याचे
  • निज नीज गड़े

नीज गोडे लडिवाळा ” असे दोन -हस्व चरण करावे लागतील. चरणांत ओखाद्या आवर्तनांत अन्तीं दोन मात्रांचा विराम असल्यास तेवढ्याकरितां ओका चरणाचे दोन चरण करण्याचे प्रयोजन नाही. चरणांतच जेथे एक वा अनेक मात्रांचा विराम असतो तेथे (-०) ही खूण करण्यांत येओील. तेव्हा चरणनिर्णय करितांना तारतम्य अवश्य पाळिलें पाहिजे. चरण हा अति-हस्वहि नसावा, आणि ओका श्वासांत म्हणतांच येणार नाही असा अतिदीर्घहि नसावा. सध्या तरी मराठीत अडतीस मात्रांच्याहून अधिक दीर्घतेचा चरण अवलोकनांत नाही. तेव्हा चरण चाळीस मात्रांहून अधिक लाम्बीचा नसावा. कचित् कोठे याहूनहि दीर्घ चरण आढळल्यास यतीच्या अनुरोधाने चरण तोडून ते योग्य लाम्बीचे करावे लागतील. ओका ओळींत ओकच चरण लिहावयाचा ही आधुनिक पद्धति चाङ्गली आहे. त्यामुळे पद्याचें श्रुतिगम्य स्वरूप दृग्गोचरहि होतें. झुद्धवजातीचे मात्र दोन दोन चरण ओका ओळींत देतात तें अिट नाही. छापणावळ वाचविण्या यचीं हैं जसे दिसायला सुन्दर दिसत नाही, त्याच प्रमाणे संहिता लहान असूनहेि पुस्तक वपुश्रीमान् दिसावें यासाठी चरणतोड करून ओळी वाढवाव्यात हेंहि प्रामाणिकपणाचें नाही. ८ जातीचे मुख्य प्रकार पद्य हें प्रायः कडव्याच्या आवर्तनाने सिद्ध होतें; परन्तु सम आणि अर्धसम प्रकारांत कडवें हें ज्याप्रमाणें कशाच्या तरी आवर्तनाने सिद्ध होतें तसे तें विषम प्रकारांत होत नाही. विषम प्रकारांत कडवें हाच लघुतम आवर्त घटक दिसतो.