पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३३८ येथे कडव्यांतील चौथा चरण हा धुवपदांतील ओखादा विभाग नाही. तो निराळ्या शब्दांचा झालेला आहे; अर्थातू येथे तो कडव्याचा घटक आहे. पण यामुळे पद्याची चाल तीच असली तरी जातीचा प्रकार मागील कवितेहून भिन्न होतो; कारण, कडव्याची घटना निराळी झाली आहे. येथे कडवें हैं ओकाच मात्रावलीची त्रिपदी वा चतुष्पदी नसून [-। प ॥ ७ +] या मात्रावलीची त्रिपदी आणि [७ --।प । ७ +] या मात्रावलीचा ओक चरण मिळून होतें. पहिला जातिप्रकार असम्मिश्र असून दुसरा सम्मिश्र आहे. या दृष्टीने पाहतां 'मम सुमन कुणा हें वाहूं कमलावरा?” (यध १६०) या पद्याची जाति 'मज चैन नसे ग, कशि मी रिझवू मना? ' (गिका ७५) या पद्याच्या जातीहून भिन्नच मानिली पाहिजे. ४ अन्तर ‘ जिकडे तिकडे जगांत सारें प्रेम साचलें दिसे, तयाविण कोठे काही नसे. o तुङ्ग महीधर गगनश्रीच्या वदनाला चुम्बिती, शशिकर जललहरी कर्षिती. दिनमणि येतां घरीं प्रेमला पूर्वदिशासुन्दरी फुलते कदम्बकुसुमापरी. हासत हासत प्रफुल्लवदनें तारागण खेळती, अम्बरी परस्परा ओढिती. (चाल पालटून) राव येतां झुघडी नेत्रांतें कमलिनी, शशि दिसतां हासे आनन्दुनि कुमुदिनी, वनलक्ष्मी नष्टते मधु आला पाहुनी; (चाल पूर्वीची) चकाल चपला, परेि मेघाला सोडुनि दूर न वसे, बघशी अन्त किती राजसे?” १ (दक ४३) ज्या संयुक्त मात्रावलीच्या आवृत्तीने ३३५ व्या पृष्ठावरील * प्रातःकाळीं ओके दिवशीं ? हें पद्य सिद्ध झालें आहे त्याच संयुक्त मात्रावलीची आवृति
पान:छन्दोरचना.djvu/365
Appearance