Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३१६ ना जें सुनीत, नित गाजे सुनें स्वनित की अमृतध्वनि न ये. (२४६) संस्कृतात “ चेटीभवन्निखिलखेटीकदम्बतरुवाटीषु नाकिपटली' हे शङ्कराचार्यकृत अम्बाष्टक स्तोत्र, (बृस्तो १९७) आणि वेदान्तदेशिककृत यादवाभ्युदय(४/१२४) हा श्लोक हीं या अमृतध्वनिवृत्तांत आहेत. मराठींत मोरोपन्ताचें कविप्रिय रामायण (मोसग्र ७/३७०) आणि सद्रत्नरामायण (मोसग्र ८/५१) हीं दोन रामायणें या वृत्तांत रचिलीं आहेत. आधुनिक मराठींत रणविहाराचा १६ वा सर्ग या वृत्तांत आहे. अमृतध्वनि हें नांव कोणी दिलें हें कळत नाही. मन्दारमाला (८२९ ) [- | ܢܝ -- - | ܚ- - ܝ -- - | ܢܝ -- -- | ܢܝ -- - | ܢܝ -- -- | ܢܝ -- - ] जाया हरीच्या जरी ठेवित प्रीति त्यांची परी रीति अत्याग्रही, कोल्हाळ ही घोर, वेल्हाळ तो थोर, त्याला न तो घोर बालाग्रही, द्याया सुखाराम राहूनि निष्काम देअी घनश्याम ती मागणी, मन्दारमाला रमालाच लाभे, क्षुभा वृक्ष तो सत्यभामाङ्गणीं ! ( २४७ ) 'अश्वधाटी दृशन्त'(मोस्फुका १/३६४) आणि 'गड्गास्तव' (मोस्फुका १/७१) हीं काव्यें मन्दारमालावृत्तांत आहेत. गुरुरामायणाचा ६४ वा श्लोकहि

  • निर्झरध्वनेि” (८३०)[अमृतध्वनी । - ७ -]

देहांमधील बळ खचौनिया सकळ होअी झुदार मग जीवावरी, ओढावयास बळ देओील तो प्रबळ, पाश्रुल हें अढळ ठेवी वरी, थोडा चळूनि जरि येशील भूमिवर