Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Roe परन्तु या प्रकरणों अमुक ओक पद्धत निरपवादपणों स्वीकारिली आहे असें म्हणतां येणार नाही; ओका वृत्ताला अनेक नावें वा अनेक वृत्तांना ओकच नाव ही दुरवस्था राहूं नये ओवढी काळजी घेतली आहे. वरतनु नावाचें जें वृत्त हेमचन्द्र साड्गतो त्याला दुसरें नावच नाही; झुलट ज्या वृत्ताला पिङ्गल वरतनु म्हणतो त्याला वराहमिहिर मालती म्हणतो, तेव्हा त्या वृत्ताला मालती हैं नाव निश्चित केल्याने हेमचन्द्राने साड़गितलेल्या वृत्ताला वरतनु हैं नाव निश्चित करितां आलें. तसेंच केदारभट्टाने ज्याला मजुभाषिणी हें नाव देञ्थून तें रूढ केलें त्याला पिङ्गलाचें कनकप्रभा हें नाव आहे; आणि हेमचन्द्र ज्या वृत्ताला मजुभाषिणी म्हणतो त्याला दुसरें नाव नाही. तेव्हा त्या वृत्ताला मजुभाषिणींच म्हणणे प्राप्त होतें; मग केदारभट्टाच्या मखुभाषिणीला कनकप्रभा हें पिङ्गलोत नाव व्यावें लागतें. निरञ्जनमाधव, विद्याधर वा. भडे, हिन्दी छन्दःप्रभाकराचा कर्ता रायबहादुर जगन्नाथप्रसाद, रणपिङ्गलकार रणछीडराय झुदयराम अित्यादि अनेक लेखक नवीं नवीं नावें देतात; पण आधार देत नाहीत. यांच्या काही नावांचा झुपयोग वैरल्याने आणि भीतभीतच केला आहे. जेथे निराळे नाव झुपलब्ध नाही तेथे मूळ नावाच्या आरम्भीं ओखादे पद जोडून नावास वेगळीक आणिली आहे. मूळ नावाच्या पूर्वी कोणता शब्द जोडायचा तो हेमचन्द्रादिकांनी दिलेल्या झुदाहरणांतूनच पुष्कळदा घेतला आहे. लक्ष्मी नावाचीं तीन वृतें आहेत, त्यांचीं नावें लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी अशीं ठेवून भेद व्यक्त केला आहे. केव्हा केव्हा हा भेद 'सु' वा ‘अति' हा भुपसर्ग जोडून व्यक्त केला आहे. नावांचा घोटाळा टाळण्यासाठी जें नाव वा नावाचा जो भाग मी दिला आहे तो दुहेरी अवतरण चिन्हांत दिलेला आहे. अरबी, फासीं छन्दःशास्त्रांतून जीं वृतें अिकडे येत आहेत त्यांना नावें मी दिलीं असून तीं दुहेरी अवतरण चिन्हांत छापलीं असून त्यांच्यापुढे * फुली दिलेली आहे. ज्या वृत्तांचा पत्ता छन्दःशास्त्रकारांना लागलेला नाही पण ज्यांमध्ये केलेली रचना झुपलब्ध आहे अशा वृत्तांना नावें त्या झुदाहरणांतील शब्दांवरूनच दिलीं आहेत. हीं नावें ओकेरी अवतरण चिन्हांत आहेत; आणि मूळ आधारभूत झुदाहरणें पुढे वृत्तविहारांत दिलेलीं आहेत.