पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RoR या वृत्ताला हेमचन्द्र कुटज म्हणतो आणि पुढे ‘ भ्रमर अित्यन्यः' असें साड्गतो; दोन्ही नावें या श्लोकाच्या आद्यन्ती आहेत. याचप्रमाणे अतिशायिनीचें म्हणून दिलेल्या झुदाहरणांत (शिशु ८/७१) अतिशायिनी आणि यादवी या दोन्ही नावांचा झुगम आहे. हंसश्येनी हें नाव (किरात ५/३१) या श्लोकावरून घेतलें आहे हें झुघड आहे. विस्मिता आणि धृतश्री हीं नावें अनुक्रमे ( शिशु २०/७१ ) आणि (शिशु ३/८२) या श्लोकावरून घेतलीं आहेत. ज्या वृत्ताला पिङ्गल वातोर्मि म्हणतो आणि वराहमिहिर अर्मिमाला म्हणतो त्या वृत्ताचें झुदाहरण म्हणून जो श्लोक हलायुध शुद्धृत करितो त्याच्या शेवटल्या म्हणजे ‘ त्याज्या सा स्त्री दुतवातोर्मिमाला ' या चरणाच्या अन्तीं दोन्हीं नावें आढळतात. हलायुधाने भद्रकाचें म्हणून जें झुदाहरण दिलें आहे त्याच्या आरम्भीं * मद्रकगीतिभि:' असें आहे; तेव्हा भरत आणि हेमचन्द्र या वृत्ताला मद्रक कां म्हणतात हैं चटकन ध्यानांत येतें. तथापि वृत्तांचीं निर्विवादपणें प्राचीनतम अशीं झुदाहरणें झुपलब्ध झाल्याविना या प्रकरणीं निश्चित असें काही साङ्गतां येणार नाही. भरताने साङ्गितलेल्या शरभललिता वृत्ताचें भुदाहरण सौन्दरनन्दाबाहेर आढळत नाही; आणि सौन्दरनन्दांतील झुदाहरणांत शरभललित हा शब्द नाही त्याअर्थी सुप्रसिद्ध वृत्तांचीं नावें ज्या श्लोकांवरून आलीं असतील ते श्लोक अश्वघोषाच्याहि पूर्वी स्फुट स्वरूपांत सुपरिचित असले पाहिजेत. सुप्रसिद्ध वृत्तांत थोडी फिरवाफिरव करून जीं नवीन वृतें प्रयोग म्हणून कवींनी वा छन्दःशास्त्रकारांनी साधिलीं असतील त्यांना मात्र त्यांनी स्वतःचीं नावें दिलीं असण्याचा सम्भव आहे. वृत्तांच्या नावांत अनन्वित गोन्धळ माजलेला आहे. काही वृत्तांना ओकाहून अधिक नावें आहेत; तर काही नावें ओकाहून अधिक वृत्तांना दिलेलीं आढळतात. शशिवदना या वृत्ताला सिद्धक, सिद्धि, सरसी, चित्रलता, रुचिरा, धृतश्री, पद्घकावली अशीं आणखी सात नावें आहेत! कनकप्रभा वृत्ताला जया, नन्दिनी, प्रबोधिता, मजुभाषिणी, मनोवती आणि सुमङ्गली अशीं आणखी सहा नावें आहेत. कुइमलदन्ती या वृत्ताला श्री, रुचिरा, मौक्तिकमाला, अनुकूला आणि सान्द्रपद अशीं आणखी पाच नावें आहेत. झुलटपक्षीं चन्द्रलेखा हें नाव सहा वृत्तांना दिलेलें आढळतें. रुचिरा, पङ्खचामर हीं नावेंहि अशीं सहा भिन्न भिन्न वृत्तांना दिलेलीं दिसतील. चित्रलेखा हें नाव पांच वृत्तांना आहे. ललिता हैं
पान:छन्दोरचना.djvu/129
Appearance