Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 66 ава в 'यमाताराजभानसलगम' या सूत्राने पिङ्गलाने साङ्गितलेल्या गणचीि असतां त्या त्या त्र्यक्षरी शब्दाचें जें लगत्वरूप होतें तें त्यांतील आद्याक्षराने निर्दिष्ट होणा-या गणाचें स्वरूप होय. यमाता (७ --), मातारा (---), ताराज (-- ५), राजभा (-५-) जभान (७ -७), भानस (- ७ ७), नसल (७, ५ ५), आणि सलगं (५ ५-), हीं य, म, त, र, ज, भ, न आणि स या गणांचों रूपें होत. ल (७) हें अक्षर लघुदर्शक असून ग (-) हें गुरुदर्शक आहे. यांच्या साह्याय्याने वृत्तलक्षण थोडक्यांत साङ्गता येतें जर्से, ‘शार्दूलविक्रीडितं म्सौ ज्सौ तौ गू आदित्यऋषयः”. परन्तु अर्थशून्य आणि झुचारकठिण सूत्र -हस्वतम असलें तरी बिनचूक लक्षांत ठेवायला थोडे श्रम पडत नाहीत. ओखाद्या श्लोकाचें वृत्त कोणतें म्हणून कोणी विचारिलें तर आपण काही गण माण्डून सूत्रस्मरणानें तें ओळखीत नाही. वाचतांवाचतांच तो श्लोक कोणत्या ओळखीच्या श्लोकासारखा आहे हैं आपला कान साड्गतो, आणि मग आपण त्या ओळखीच्या श्लोकाच्या वृत्ताचें नाव साड्गतों. म्हणून, वृत्त ओळखतां यायला प्रत्येक सुप्रसिद्ध वृत्ताचें ओक ओक झुदाहरण चाङ्गलें ध्यानांत ठसलें की पुरें. विचारलेल्या श्लोकाची शुद्धता तुलनेने सहज पारखतां येअील. यतिस्थानेंहेि श्लोक म्हणतांना आपण विशेष कोठे थाम्बतों हें पाहूनच ध्यानांत रहातात. तेव्हा तोण्डपाठ करावयाच्या शुद्ध श्लोकांत त्याच्या वृत्ताचें नाव ग्रथित केलेलें असल्यास तेंहि अनायासें साङ्गतां येअील. त्र्यक्षरी गणहि साङ्गा म्हणून कोणी आग्रहच केल्यास आरम्भींपासून त्र्यक्षरी तुकडे पाडून लगक्रम माण्डून यमाताराजभानसलगम् या सूत्राच्या साहाय्याने त्या गणांचीं नावेंहि साङ्गतां येतील. २दुसरें ओक सूत्र 'मायावी यतात्मा रावण: सहसा तन्त्राणि जजाप भावय न अिति ” हें ओका विद्वान् जर्मन स्नेह्याकडून मिळालें असें चालैस फिलिप ब्राश्रुन आपल्या Sanskrit Prosody च्या ३ या पृष्ठावर म्हणतो. “यमाताराजभानसलगम ” हें सूत्र पाणिनीने केलें असें याच ब्राश्रुनने २८ व्या पृष्ठावर लिहून ठेविलें आहे. या सूत्राचा झुगम मला सापडला नाही.