Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ८५ यमक, यति, अक्षर अाणि गण (२३) प्राचीन मराठी कवितेंत अकारान्त स्त्रीलिङ्गी नामांना निष्कारण औी जोडीत असत जसें आगी, सरी, चाडी, तळमळी. हीं रूपें आता नकोत. (२४) आता, आपणां, आपुला अित्यादे पाच सहा शब्द सोडले तर शब्दारम्भोंच्या आचा अ करणें युक्त नाही. आडग, आजून, आळस हीं रूपेंहि त्याज्य मानार्वत. (२५) धक्का, बुक्की, हद्द अित्यादि शब्दांत दुहेरी व्यज्ञानाच्या ठिकाणीं ओकेरी व्यञ्जन सहसा वापरूं नये. (२६) छी, थू, तू, मी अित्यादि ओकाक्षरी शब्द -हस्व वापरू नयेत; पण हा नियम की, नी, ही, या अव्ययांना लागू नसावा. (२७) सर्वनामांच्या रूपांत विविधता फार आहे. मला याच्या ठिकाणीं मज, मजला, मजलागी, मजलागून, मशी, मजशी, मातें, मजप्रति अशीं आठ रूपें वापरितां येतात. माझ्या, तुझ्या, त्याच्या, याचीं माझिया, तुझिया, त्याचिया अशींहि रूपें होतात. अियेस, तियेचें, तयाला, मियां, म्यां, तुवां, त्वां अित्यादि विविध रूपें तारतम्याने वापरून जिवन्त ठेवावींत. आम्ही तुम्ही, माझी, तुझी, त्याची अित्यादि शब्दांतील अन्त्य स्वर -हस्व करूं नये. ही, जी, ती या स्त्रीलिड्गी रूपांच्या ठिकाणी हे, जे, ते हीं रूपें यमकादि शब्दचमत्कृतीपुरतीच वापरण्यासारखीं आहेत. (२८) सर्वनामांप्रमाणेच अव्ययांचींहि विविध रूपें आढळतात. याच शब्दांना चिल्हर म्हटलें आहे. अितर शब्द अविकृत रहावेत म्हणून या किरकोळ शब्दांचीं विविध रूपें चालू रहावींत हेंच योग्य होय. रूपांची विवि धता पहाः-- ( १) अलीकडे, अल्याड, औलीकडे, औलाड. (२) असें, औसे, ओवि, ओवी, कसें, कैसें, केवि, केवी, तसें, तैसें, तेवि, तेवी (३) आज, आज, आजी. (४) आणि, अन्नू, नि. (५) अिथ, अिथे, येथे, कुठ, कुठे, कोठे, तिथ, तिथे, तेथे. (६) कऔीं, कैं, कदा, कधी, कव्हा, केव्हा, जअीं, जै, जंव, जधी, जव्हा, जेव्हा त्याचप्रमाणें तओं, तैं अित्यादि