पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ८१ यमक, यति, अक्षर अाणि गण लेखनाप्रमाणे सरळ वाचन करीत गेलें की तें प्रायः शुद्ध व्हायचेंच हा जसा बालबोध (नागरी) लिपीचा विशेष आहे, त्याप्रमाणे आधुनिक मराठी कविता लेखनाप्रमाणे सलग स्पष्ट वाचीत गेल्याने तिच्यांतील छन्दाचा बोध आपोआप होतो, हा जो बहुमोल विशेष मोरोपन्त-देवलादि पद्यप्रभूंना मराठींत कमावून आणला आहे तो गमावणें अनर्थावह होअील. हा विशेष प्राचीन मराठी कवितेंत लागतात; कारण लेखनानुसारी वाचनाने त्यांच्यांतील छन्दाचा बोध होत नाहीं. पद्यरचनेंत अडचणी येत नाहीत असें नाही; परन्तु अडचणीच्या निमित्ताने अस्पटोचाराचा चज्ञ्चुप्रवेश होङ्यूं दिला तर तो परिणामीं घातक झाल्याविना रहाणार नाही. प्रणय, प्रीति आणि प्रेम ही शब्दांत्रयी मात्र जितकी अपरिहार्य तितकीच जाचक आहे तेव्हा या तीन शब्दांच्या पुरताच 'तीव्रप्रयत्नीचार” क्षम्य ठरेल. संयुक्त वर्णाचा झुचार अस्पष्ट करणें हा अक्षम्य दोष आहे हें मनाला पटल्याविना तो टाळण्याचे कष्ट कोणी करणार नाही. असे दोष जितके दुर्मिळ कवीला शब्दक्रम फिरविण्याची, अपरिचित पर्याय वापरण्याची आणि शब्दांचीं रूपें विकृत करण्याची थोडी मोकळीक असते. ४ निरङ्कुशत्वाच्या मर्यादा या मोकळिकीचा विचार थोड्या विस्ताराने येथेच करून टाकणें बरें. पद्यरचना म्हणजे विशिष्ट साच्यांत निरनिराळ्या मात्राकाराचे शब्द-खडे बसवून करावयाची सार्थ आणि लयबद्ध अक्षररचना होय. ही जितकी हृदयड्रम तितकीच दुष्कर असल्याने गद्यलेखकापेक्षा कवीला थोडें अधिक स्वातन्त्र्य देण्यांत पासून च्युति ही काही प्रमाणांतच क्षम्य असते. तेव्हा कवीने किती स्वातन्त्र्य चालवावें याचा विचार नेमस्तपणाने आणि तडजोडीने व्हायला पाहिजे. कवि आणि वाचक यांनी ओकमेकांची सोय पहायला हवी; आणि भाषा ही सर्वांचीच असल्यामुळे तिच्या स्थैर्याकडे, स्वत्वरक्षणाकडे आणि संवर्धनाकडे सर्वांनीच लक्ष्य पुरवायला हवें. शब्दक्रम फिरविण्याची आणि अपरिचित पर्याय नि शब्दांचीं 5 5
पान:छन्दोरचना.djvu/108
Appearance